आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एका बैठक म्हणा किंवा मेळावा म्हणा तो मुंबईत पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी का कोणास ठाऊक पण एकदम आक्रमक भाषण केल. या भाषणात त्यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना एक तर तू राहशील नाही तर मी राहीन अशी भाषा केली.