अंधेरीतील नगरसेवक अभिजित सामंत यांच्या नव्या कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतीली कांगावाखोरांवर हल्ला चढवला. त्याबरोबरच त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला देखील टोला लगावला आहे.
कालच्या मन की बात मध्ये केंद्राने सर्व पात्र भारतीयांचे मोफत लसीकरण करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्याबाबत काही प्रश्नच उरत नाही. मात्र ज्या राज्यांना आपल्याबाजूने वेगाने लसीकरण करायचे असेल त्यांनी लस खुल्या बाजारातून खऱेदी करावी आणि आपल्या तर्फे लसीकरणाचा वेग वाढवावा. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय १ तारखेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणासाठी स्पष्ट धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचे देखील सांगितले. अनेक लोकांचे या टप्प्यात लसीकरण होणार असल्याने गर्दीची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा:
पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात
अमेरिका पाठवणार कोविड लसीचा कच्चा माल
त्या बरोबरच पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता महाविकास आघाडीने देखील लसीकरणाबाबत एकवाक्यता ठेवावी. असा टोला देखील त्यांनी यावेळी सरकारला लगावला.
रेमडोसिवीर बाबात बोलताना दहा दिवसांतील १६ लाख उत्पादनापैकी ४ लाख रेमडेसिवीर महाराष्ट्राला दिले आहेत. इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला जास्त रेमडेसिवीर मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे १७५० मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात आला आहे. इतर कुठल्याही राज्यापेक्षा दुप्पट कोटा देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला व्हेंटिलेटर सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. ११०० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर मिळाले आहेतच शिवाय अजून मोठ्या प्रमाणातील मदत येत आहे. त्यामुळे कांगावाखोर लोकांना विनंती आहे, लोक दुखावत आहेत, केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत दिली जात आहे. त्यामुळे रोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करावं अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे.