25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषहावडा-मुंबई एक्स्प्रेसला झारखंडमध्ये अपघात; १८ डबे रुळावरून घसरले

हावडा-मुंबई एक्स्प्रेसला झारखंडमध्ये अपघात; १८ डबे रुळावरून घसरले

अपघातात दोन जणांचा मृत्यू

Google News Follow

Related

झारखंडमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला असून चक्रधरपूर जवळील बारा बंबू गावानजीक हा अपघात झाला. हावडा-मुंबई मेल या गाडीला हा भीषण अपघात झाला असून या अपघातात रेल्वेचे १८ डबे रुळावरून घसरले आहेत. ही रेल्वे हावड्यावरून (पश्चिम बंगाल) मुंबईच्या दिशेने जात होती. या रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत सहा जण जखमी झाले असून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. सर्व जखमी प्रवाशांना उपचारसासाठी रवाना करण्यात आले आहे.

हावडा- सीएसएमटी (मुंबई) एक्सप्रेस, ट्रेन नंबर १२८१० ही चक्रधरपूर डिव्हीजनमधील बारा बंबू गावानजीक रुळावरून घसरली. ही मेल हावड्यावरून मुंबईला जात होती. या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. पहाटे ३.४५ च्या सुमारास हा अपघात झाला. गाडीचे १८ डबे घसरले असून यापैकी १६ प्रवासी डबे, एक पॉवर कार आणि एक पॅन्ट्री कार होती, अशी माहिती आहे.

या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. टाटानगर- 06572290324, चक्रधरपूर- 06587 238072, हावडा- 9433357920 आणि रांची- 0651-27-87115 हे हेल्पलाईन नंबर रेल्वेने जारी केले आहेत. दरम्यान, या मार्गावरील तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर एक गाडी शॉर्ट टर्मिनेट करून इतर मार्गावरून वळवण्यात आली आहे. हावडा-कांताबंजी इस्पात एक्स्प्रेस (२२८६१), खरगपूर-धनबाद एक्स्प्रेस आणि हावरा-बार्बिल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दक्षिण बिहार एक्स्प्रेस (१३२८८) इतर मार्गावरून वळवण्यात आली आहे. तर, आसनसोल टाटा मेमू पास स्पेशल ट्रेन (०८१७३) हिचा प्रवास आद्रा येथे संपवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

राहुल गांधींच्या त्या वक्तव्यावर निर्मला सीतारामन यांनी कपाळावर हात मारला!

उबाठा गटाच्या नेत्याचे अचानक निधन झाल्यानंतर अर्नाळ्यातील रिसॉर्टस पाडले!

उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहाद प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा

केजरीवालांविरोधात सीबीआयकडून आरोपपत्र

प्रत्यक्षदर्शीनी या अपघाताबाबत सांगितलं की, रात्री रेल्वे स्थानकावर असताना ३.४५ च्या सुमारास मोठा आवाज आला. आवाजाच्या दिशेने पाहिल्यास दिसलं की एक रेल्वे हलत आहे आणि एका बाजूला झुकली आहे. शिवाय काही प्रवासी पडतायत असं वाटत होतं. रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरल्याचं लक्षात आलं. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने म्हटलं आहे की सर्व जखमी प्रवाशांना घटनास्थळी प्रथमोपचार देण्यात आले आहेत. तसेच हा अपघात कशामुळे झाला? या गोष्टींचा तपास केला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा