30 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामाउरणमध्ये लव्ह जिहादमुळे उद्रेक, तरुणीची हत्या करून फेकून दिला मृतदेह, दाऊद शेखचा...

उरणमध्ये लव्ह जिहादमुळे उद्रेक, तरुणीची हत्या करून फेकून दिला मृतदेह, दाऊद शेखचा शोध सुरू

एफआयआर दाखल केल्यामुळे बदला घेतल्याचा पालकांचा आरोप

Google News Follow

Related

देशभरात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या असताना आता उरणमध्येही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यशश्री शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्यानंतर तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आल्याचे समोर आले आहे. तिच्या शरीरावर अनेक अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. तिच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार दिसत असून तिचे केस कापण्यात आले आहेत, तिची गुप्तांगे कापण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. तिचे डोके ठेचण्यात आल्याचेही स्पष्ट होत आहे. २५ जुलैला ती हरवल्याचे स्पष्ट झाले होते. तशी तक्रार करण्यात आली होती. यासंदर्भात दाऊद शेख या रिक्षााचालकाचा शोध सुरू आहे. तो मूळचा कर्नाटकचा असल्याचेही समोर आले आहे.

यासंदर्भात यशश्रीच्या संतप्त पालकांनी आरोप केला आहे की, २०१९मध्ये दाऊद शेख या रिक्षाचालकाने तिचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल करण्यात आला होता तसेच पॉक्सो अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. त्यानंतर त्याला तुरुंगवास झाला. त्यानेच जामिनावर सुटल्यानंतर आपल्या मुलीचे अपहरण करून तिची क्रूरपणे हत्या केली आहे.

उरण बंद

या घटनेनंतर उरण बंदची हाक देण्यात आली असून जनक्षोभ प्रचंड वाढला आहे. या लव्ह जिहादमागील सूत्रधाराला लवकर अटक करावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे. उरणमधील फुल मार्केटपासून लोकांनी या घटनेविरोधात लाँगमार्च काढला. लोकांमध्ये संतापाची भावना असून गुन्हेगाराला फाशी द्यावी किंवा आमच्या हवाली करावे अशी मागणी लोक करत आहेत.

शुक्रवारी रात्री उरण पोलिसांना कोटनाका येथे या तरुणीचा भयंकर अवस्थेतील मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे आढळले. तिचे डोके ठेचलेले दिसले तसेच तिच्या कंबरेवर आणि पाठीवर शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमाही दिसत आहेत.

यासंदर्भात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार यशश्री हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. जेव्हा हा मृतदेह हाती लागला तेव्हा पालकांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तिच्या कपड्यांवरून आणि तिच्या शरीरावरील टॅटूवरून तिची ओळख पटली. पोलिसांनी म्हटले आहे की, अज्ञात इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांनी दाऊद शेख या इसमाचे नाव सांगितले आहे. सदर संशयित हा कर्नाटकचा आहे. त्याचा फोन सध्या बंद असून तो फरार झालेला आहे.

हे ही वाचा:

दिल्लीत कोचिंग सेंटरच्या तळघरात साचलेल्या पाण्यात तीन विद्यार्थी बुडाले !

नीती आयोगाच्या बैठकीत ममता बॅनर्जींची नौटंकी

सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १ कोटीहून अधिक भगिनींचा सहभाग

२०१९ ला १५ वर्षांच्या यशश्रीचा विनयभंग केल्याबद्दल दाऊद शेख वर कलम 354, 507,12,8 अंतर्गत उरण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला होता. त्यातून दाऊद शेखला तीन महिने तुरुंगवास झाला. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. तेव्हा दाऊद शेख राहत्या घरी कर्नाटकमध्ये राहायला गेला. पाच दिवस आधी तो पुन्हा उरणला आला, अशी माहिती आता समोर येते आहे.

याबाबत भाजपाचे नेते व आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड, अबू आझमी हे नेते आता कुठे आहेत. महाराष्ट्रात, देशात लव्ह जिहाद नाही. धर्मांतरण होतच नाही. आता ते कुठल्या बुरख्याखाली लपलेत. यशश्री शिंदेवर जे धर्मांधाने अत्याचार केलेत. त्या जिहाद्याला जी शिक्षा द्यायची ती आमचे हिंदुत्ववादी सरकार देईलच. हिंदुत्ववादी समाज याचे चोख प्रत्युत्तर देईल, हे लव्ह जिहाद्यांनी लक्षात ठेवावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा