महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारत सर्व जागांवर विजय प्राप्त केला होता. ११ जागांसाठी १२ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटलांना पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान, विधान परिषदेच्या नवनिर्वाचित ११ उमेदवारांचा आज (२८ जुलै) शपथ विधी सोहळा पार पडला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.
विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा शपथ ग्रहण सोहळा संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या विजयी उमेदवारांना शपथ दिली. यावेळी सर्व विजयी उमेदवारांनी शपथ घेतली. पंकजा मुंडे (भाजप), योगेश टिळेकर (भाजप), अमित गोरखे (भाजप), परिणय फुके (भाजप), सदाभाऊ खोत (भाजप), भावना गवळी (शिंदे शिवसेना), कृपाल तुमाने (शिंदे शिवसेना), शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), राजेश विटेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष), प्रज्ञा सातव (काँग्रेस), मिलिंद नार्वेकर (उबाठा) या ११ नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली.
हे ही वाचा..
शिळफाटा अत्याचार, हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा !
बांगलादेशी युट्युबर शिकवतोय, पासपोर्ट- व्हिसाशिवाय भारतात कसे घुसायचे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १ कोटीहून अधिक भगिनींचा सहभाग
पवारांनी जरांगेंना हिंग लावून विचारले नाही…
दरम्यान, विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उभे होते. विधानपरिषद निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुतीने ९ उमेदवार उभे केले आहेत. तर विरोधी महाविकास आघाडीचे ३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये भाजपचे ५, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांनी प्रत्येकी २ उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात होता.
यामध्ये शेवटच्या टप्पात उबाठाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्यात लढत झाली. कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर, मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला आणि जयंत पाटलांचा यामध्ये पराभव झाला. या निवणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचेही समोर आले होते.