सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीताराम#न यांनी देशाचा अत्यंत संतुलित असा अर्थसंकल्प मांडला. आणि त्यांनी अर्थसंकल्प मांडला रे मांडला तोच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही मिळाले नसल्याची ओरड करण्यास सुरुवात केली. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले याची कसलीही खातरजमा न करता सुरु असणाऱ्या या रडगाण्यावर काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रहार केला.