अशोक तुपे, सोपान बोंगाणे, मोतीचंद बेदमुथा या पत्रकारांचे एकाचदिवशी निधन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी आणखी दोन पत्रकारांचे निधन झाले. हिंदू या वर्तमानपत्रासाठी तीन दशके छायाचित्रण करणारे विवेक बेंद्रे आणि दैनिक नवाकाळचे प्रतिनिधी सदानंद शिंदे यांचे करोनामुळे निधन झाले.
हेही वाचा:
गुजरातहून महाराष्ट्रात येणार ४४ टन ऑक्सिजन
ठाकरे सरकारने या चार गोष्टी केल्या असत्या तर…
जयंत पाटील अनिल देशमुखांचे वॉचमन आहेत का?
मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात सर्वांनाच परिचित असणारे ज्येष्ठ छायाचित्रकार विवेक बेंद्रे यांचं करोनामुळे रविवारी सकाळी निधन झालं आहे. ते ५९ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे माध्यम विश्वातून आणि मुंबईच्या क्रिकेट वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. १७ एप्रिल रोजी ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे त्यांना मुंबई पालिकेच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, २५ एप्रिल रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सदानंद शिंदे हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे ज्येष्ठ सदस्य होते तसेच नवाकाळचे प्रतिनिधी होते. रत्नागिरी टाइम्स, पुण्यनगरी या वर्तमानपत्रातही त्यांनी राजकीय पत्रकारिता केली. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.