31 C
Mumbai
Thursday, October 31, 2024
घरसंपादकीयदिब्रिटोनी युरोप अमेरिकेत जन्म घ्यावा!

दिब्रिटोनी युरोप अमेरिकेत जन्म घ्यावा!

Google News Follow

Related

फादर फ्रांसिस दिब्रेटो यांचे मंगळवारी निधन झाले. मृत्यूनंतर वैर संपते ही सनातन धर्माची भूमिका आहे. परंतु, मृत्यूनंतर एखाद्याच्या जीवीत कार्याची चिकित्सा होऊ नये, असा काही नियम नाही. मनात कोणतीही वैर भावना किंवा आकस न बाळगता अशा प्रकारची चिकित्सा होऊ शकते. अशाप्रकारची चिकित्सा समाजवादी विचारवंत, युवक क्रांती दलाचे संस्थापक आणि प्रकांड पंडीत मे. पू. रेगे यांनी दिब्रेटो यांच्या हयातीत केलेली आहे. त्याचा संदर्भ देत महाराष्ट्र टाईम्सचे ज्येष्ठ पत्रकार सारंग दर्शने यांनी केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. या चर्चेमुळे दिब्रेटोंचा बुरखा तर फाटलाच आहे, त्यांचे खंबीर समर्थक असलेल्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचा दांभिकपणाही लोकांसमोर आलेला आहे.

सहिष्णूतेचा गंध, वारा नसलेले ख्रिस्ती पादरी गेली कित्येक दशके भारतात मोठ्या प्रमाणात बाटवाबाटवी करत आहेत. हे कपोलकल्पित विधान नाही. हा इतिहास सप्रमाण मांडणारी गोवा इक्विझिशन सारखी कित्येक पुस्तके बाजारात उपलब्ध आहेत. अनंत प्रियोळकर लिखीत या पुस्तकात पोर्तुगीज राजवटीत गोव्यात धर्मांतरासाठी ख्रिस्ती पाद्र्यांनी केलेला नंगानाच तपशीलवार दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात याचे दाखले आहेत. आजही गोव्यात तो ‘हात कातरो’ खांब अस्तित्वात आहे. जिथे धर्मांतर नाकारणाऱ्या शेकडो हिंदूंचे हात छाटण्यात आले. हा इतिहास कायम दडवून ठेवत ख्रिस्ती धर्म म्हणजे स्वातंत्र्य, बंधुता आणि समतेची मूल्य देणारा धर्म असे धादांत असत्य आयुष्यभर सांगणाऱ्या फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांचे बुधवारी निधन झाले.

माझ्या देवाला शरण गेलात तर तुम्हाला स्वर्गाचे बुकिंग मिळेल नाही तर तुम्ही कयामत पर्यंत नरकात जाणार. माझा देव हाच देव, बाकीचे सगळे सैतान, असे ज्यांचा धर्म ओरडून ओरडून सांगतो, ते भारतात शांतता आणि सहिष्णूतेचा संदेश देतात. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रथिगच्छति…चा संदेश देणाऱ्या मागासलेल्या हिंदूंना बाटवून त्यांची स्वर्गात जाण्याची सोय करतात. भारत स्वतंत्र झाला असल्यामुळे आता धर्मांतर केले नाही तर हात कापणे शक्य नाही. त्यामुळे सेवेच्या बुरख्या आड वनवासी क्षेत्रात, दलित वस्त्यांमध्ये शिरलेले पादरी मोठ्या संख्येने लोकांची बाटवाबाटवी करत आहेत. दिब्रेटो हे त्यांचे प्रतिनिधी होते. हिंदूंचे धर्मांतरण करताना हात बरबटले तरी चालेल, परंतु चेहरा मात्र विचारी आणि पुरोगामी राहिला पाहिजे, याची काळजी दिब्रेटोंनी कायम घेतली. कारण असा चेहरा सावज टीपण्यासाठी उपयुक्त असतो.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिब्रेटो यांनी गुंडगिरीशी दिलेल्या लढ्याचे एक्सवर अपलोड केलेल्या पोस्टवर कौतुक केले आहे. दिब्रेटोंनी ठाकूर कंपनीशी दोन हात केले, त्याबाबत पवार बोलतायत. दांभिकता ही पुरोगाम्यांची खासियत आहे. ती पवारांमध्ये ठासून भरलेली आहे. दिब्रेटो वसई-विरारमध्ये ज्यांच्या विरोधात लढले त्या ठाकूर कंपनीचे एकेकाळी राजकीय गॉडफादर कोण होते ? हे महाराष्ट्रापासून लपलेले नाही. पुरोगामी नेते असो वा धर्मप्रसारक त्यांचे अंतरंग हे असे असतात. उक्ती एक आणि कृती एक.

हिंदूंना बाटवणे हे दिब्रेटोंचे जीवीत कार्य होते. वसई-विरारमधली गुंडगिरीत दिब्रेटोंना बाटवाबाटवीसाठी उपयुक्त ठरली असती तर दिब्रेटोंनी त्यांना स्वातंत्र्यसैनिकही ठरवले असते. तुम्हाला जेव्हा कोणाला बाटवायचे असेल तर त्यांच्या आधीच्या श्रद्धाबाबत त्यांच्या मनात हिन भावना निर्माण कराव्या लागतात, ही श्रद्धा नष्ट करावी लागते. त्यासाठी तुमचे देव तुमचे भले करू शकत नाहीत, ते मुळात देव नाहीच ते सैतान आहेत. तुम्हाला स्वर्गात जायचे असेल तर तुम्हाला येशूलाच शरण जावे लागले. स्वर्गाचे तिकीट फक्त आमच्या धर्मातील लोकांना मिळते, अशा भाकड कथा सांगत पादरी गावोगाव फिरत असतात. ज्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढायचे त्या सावजांच्या मनात त्यांच्या श्रद्धास्थानांबाबत हिन भावना रुजवत असतात. अलिकडे त्यांचे अनुयायी ख्रिस्त नारायणाच्या कथा सांगत, भगव्या वस्त्रांमध्ये प्रसाद वाटप करतानाही दिसतात. दिब्रेटोंनी आय़ुष्यभर हेच केले. हे करताना आम्ही ख्रिस्ती बनण्यासाठी सक्ती केली जात नाही हे त्यांनी आय़ुष्यभर ओरडून सांगितले. परंतु, गोरगरीबांना मुर्ख बनवले जाते, त्यांना कधी धान्याची, तर कधी औषधांची, कधी नोकऱ्यांचे आमिष दिली जातात. यावर मात्र ते मौन राहिले. त्यांचे हे जीवीत कार्य अर्थात बाटवाबाटवी आणि बनवेगिरी मे.पु.रेग्यांनी पुराव्यासह मांडली. रेगे कोणी हिंदुत्ववादी नव्हते. संघाचे कडवे विरोधक होते. घनघोर समाजवादी होते. परंतु त्यांनी बुद्धी गहाण ठेवलेली नव्हती.

मे.पू.रेगे यांनी दिब्रेटो यांचे वस्त्रहरण केल्यानंतर त्यांना नवहिंदुत्ववादी म्हणेपर्यंत काही जणांची मजल गेली होती. परंतु, त्यांनी मांडलेली तथ्य खोडून काढण्याच्या भानगडीत कोणी पडले नाही. कारण ते सोयीचे नव्हते. दिब्रेटो हे विचारवंत म्हणून वावरले. आडून आडून हिंदुत्ववाद्यांना टार्गेट करण्यात त्यांची हयात गेली. फॅसिस्ट, गोडसेवादी, मनुवादी ही लेबलं अन्य पुरोगाम्यांप्रमाणे त्यांनीही हिंदुत्ववाद्यांनी चिकटवली. परंतु, ख्रिस्ती धर्मातील कुरीतींवर बोलण्याचे किंवा त्या दूर करण्याचे धाडस त्यांनी केले नाही. अलिकडे मनुस्मृतीच्या विरोधात बोलणाऱ्यांचे पिक आले आहे. मनुस्मृती जाळण्याचे प्रकारही केले जातात. हे पुरोगामी कधी अन्य धर्मग्रंथांची चिकीत्सा करण्याच्या भानगडीत कधी पडत नाहीत. त्यांचा बुद्धीवाद कायम हिंदू धर्माच्या चिकीत्सेपर्यंत मर्यादीत राहतो.

हे ही वाचा:

पठाणकोटमध्ये ७ संशयास्पद व्यक्ती दिसले, जम्मूमध्ये हाय अलर्ट !

सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यापूर्वी नेमबाजांना अनमोल बिश्नोईने दिला होता खास संदेश

पाकिस्तानचे नापाक मनसुबे कधीही यशस्वी होऊ देणार नाही!

कमला हॅरिस म्हणाल्या, ‘इस्रायल-गाझा’ युद्धावर गप्प बसणार नाही !

पृथ्वी गोल नसून चपटी आहे, ती स्थिर असून सुर्य तिच्या भोवती फिरतो हे मानणाऱ्या धर्माचे प्रचारक कायम दुसऱ्याच्या घरात झाकत राहिले. युरोपात चेटकीण ठरवून जाळण्यात आलेल्या ५० लाख महिलांच्या हत्येचा हिशोब हे कधी देणार? आफ्रीकेत या पादऱ्यांनी केलेला कहर सर्वज्ञात आहे. जेव्हा मिशनरी आमच्याकडे आले तेव्हा त्यांच्याकडे बायबल होते आणि आफ्रीकन लोकांकडे जमीन होती. त्यांनी आम्हाला डोळे बंद करून प्रार्थना करायला शिकवले. जेव्हा आम्ही डोळे उघडले तेव्हा आमच्याकडे बायबल होते आणि त्यांच्याकडे जमीन. हे वाक्य केनियाचे दिवंगत पंतप्रधान जोमो केन्याटा यांचे आहे. पादऱ्यांनी जगभरात जो उत्पात केला त्याचे हे सार आहे. इशान्य भारतातील दहशतवादाच्या मुळाशी चर्च आहे, मिशनरी आहेत. आदिवासी क्षेत्रात नक्षलवादी आणि मिशनरी हातात हात घालून काम करतात. हे पादऱ्यांचे जळजळीत वास्तव आहे.

दिब्रेटो अशा विषयांबाबत मौन राहीले, कारण सत्य सांगणे हे त्याच्या जीवनाचे लक्ष्य नव्हते. त्यांना फक्त बुद्धीभेद करून आपल्या सावजांची संख्या वाढवायची होती. आज युरोप अमेरीकेत ख्रिस्ती धर्माबाबत लोकांची उदासीनचा इतकी वाढली आहे की तिथे चर्च विकले जात आहेत. युरोपिय देशांमध्ये कोणतेही आमिष न दाखवता आणि कोणाचेही हात न कापता हजारो लाखो ख्रिस्ती बांधव हातात भगवद् गीता घेऊन हरे राम हरे कृष्णाचा गजर रस्त्या रस्त्यावर करीत आहेत. दा विंची कोड सारखे सिनेमे ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे पितळ उघडे पाडीत आहेत. जर पुनर्जन्म कुठे असेलच तर दिब्रेटोंना ख्रिस्ती धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी युरोप किंवा अमेरीकेत जन्म घ्यावा लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
186,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा