27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषगौरी गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा !

गौरी गणपतीला मिळणार आनंदाचा शिधा !

राज्य सरकारचा निर्णय

Google News Follow

Related

यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिकाधारकांना “आनंदाचा शिधा” वितरीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

प्रती संच १०० रुपये या सवलतीच्या दराने मिळणाऱ्या या “आनंदाचा शिधा” संचामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नसांचा समावेश असणार आहे. “आनंदाचा शिधा” संच्याचे वाटप दि १५ ऑगस्ट २०२४ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.

हेही वाचा..

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध

खलिस्तानी खासदार अमरीपाल सिंगच्या समर्थनावरून काँगेसचे घुमजाव !

रशिया- युक्रेन युद्धाचे सावट ऑलिम्पिकवर; रशियाच्या सहभागावर बंदी!

अलिबागजवळ भरकटलेल्या जहाजातून १४ क्रू मेंबर्सची सुखरूप सुटका

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी यांना या आनंदाचा शिधा मिळणार आहे.

प्रती शिधापत्रिका एक शिधा जिन्नस संचाची खरेदी करण्यासाठी ५६२.५१ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. या संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा