अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्याच पक्षाचे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ते काय बोलत होते, सचिन वाझे बद्दल काय बोलत होते, याचे ऑडीओ व्हिजुअल्स त्यांच्याच लोकांनी माझ्याकडे आणून दिले आहेत. आज पर्यंत मी यावर बोलत नव्हतो, मात्र आता वेळ आल्यावर मी ते जाहीर करेन अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुली प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर झाला होता, तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. आपण कधीही डूक ठेऊन राजकारण करत नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनिल देशमुख सध्या जामिनावर बाहेर आहेत. ते सुटलेले नाहीत. शाम मानव यांनी जे आरोप केले त्याबद्दल मानव यांनी माझ्याशी बोलायला हवे होते मात्र सध्या सुपारी घेऊन बोलणारे जे घुसले आहेत, त्यांच्या नादी मानव लागले आहेत का ? असा प्रश्न पडतो असेही ते म्हणाले. अनिल देशमुख गृहमंत्री असताना विरोधी पक्षातील गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी त्यांनी कसा दबाव आणला होता, गुन्हे दाखल करायला लावले होते त्याचे काही ऑडीओ पुरावे आपण दिले होते, या संदर्भात सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, असे फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा:
प्रत्येक राज्याचे नाव अर्थसंकल्पात घेणे शक्य नसते हे काँग्रेसला कळत नाही?
काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान कोसळले, १८ जणांचा मृत्यू !
जरांगे पाटलांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी !
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा; एक जवान हुतात्मा
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपाबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, जरांगे यांच्यावरील केस २०१३ मधील आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या विरोधात वॉरंट निघाले होते, ते त्यांनी रद्द करून घेतले आहेत. तारखेला हजर राहिले नाही तर न्यायालय वॉरंट काढत असते, हा प्रक्रियेचा भाग आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणात फडणवीस यांना लक्ष्य का केले जाते? या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, फडणवीस यांच्यावर आरोप केले तर कोणाला फायदा होणार आहे? देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कोणाला धोका वाटतो, त्यांच्याकडूनच असे प्रकार सुरु असल्याचे फडणवीस म्हणाले.