28 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषलस घेण्याआधी नागरिकांनीच उपलब्धतेची खात्री करावी- किशोरी पेडणेकर

लस घेण्याआधी नागरिकांनीच उपलब्धतेची खात्री करावी- किशोरी पेडणेकर

Google News Follow

Related

मुंबईत काही ठिकाणी लसीकरण केंद्र बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्राबाहेरही लसीकरण बंद असल्याचा बोर्ड लावण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या लसीकरणाविषयी माहिती दिली. तसेच मुंबईत एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरु आहे, असं त्यांनी सांगितलं.

सध्या देशासह राज्यातही कोरोना रुग्णसंख्येचा चढता आलेख पाहायला मिळत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळं आरोग्य व्यवस्थेवरही ताण आला आहे. देशातील अनेक राज्यांत ऑक्सिजन, बेड्स, लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर बोलताना म्हणाल्या की, “आपण प्रत्येक वेळी सगळ्यांना दाखवतोय की, आपल्याकडे इतकाच साठा आहे. लोकांनी लस घेण्यासाठी जाताना आधी खात्री करुन जायला हवं. लसींचा साठा सकाळी १० वाजता येतो आणि त्यानंतर रुग्णालय, केंद्रांवर जातो. लोक जर त्याबाबत विचारपूस करून गेले, तर त्यांची धावपळ कमी होईल.”

हे ही वाचा:

जयंत पाटील अनिल देशमुखांचे वॉचमन आहेत का?

लसीकरणाबाबत अफवांना बळी पडू नका

दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढला

आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी

“१ मे पासून आपण १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण करणार आहोत. यासाठी सर्वच स्तरावर नियोजन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. लसीकरणाचा साठा जसा पोहोचेल, त्यानुसार टप्प्यांनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य अशा पद्धतीने लसी दिल्या जातील. उपलब्ध लसींचा साठा देखील बोर्डवर दाखवला जाईल. त्यानुसार लोकांनाही कळू शकेल. अनेक ठिकाणी असं घडतंय की, ३००-३५० लोकांचं लसीकरण झालं की, साठा संपतो आणि मग उरलेल्या लोकांचे वाद होतात.” असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा