सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीबीआय देशमुखांच्या घरी बाहेरून कागदपत्रे घेऊन गेली होती, असा गंभीर आरोप केला आहे. पाटलांच्या या आरोपाचा माजी खासदार निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे.
निलेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. जयंत पाटील हे अनिल देशमुख यांच्या घराचे वॉचमन आहेत का? ज्यांचं घर आहे, जे त्या घरात राहत आहेत. ते आरोप करत नाहीत आणि ज्यांचा घराशी काहीच संबंध नाही, ते आरोप करत आहेत. बरं घरात कोण जातं आणि कोण येतं हे वॉचमनशिवाय कोण सांगू शकतो, त्यामुळे पाटील यांना ही माहिती असल्याने कदाचित ते देशमुखांच्या घरचे वॉचमन असावेत, असा टोला राणे यांनी लगावला. जयंत पाटलांनी डोकं लावून बोलावं. तुम्हाला हे शोभत नाही, असं सांगतानाच परमबीर सिंग यांना त्यावेळी मांडीवर घेऊन बसला होता. आता ते व्हिलन झाले आहेत काय? असा सवालही त्यांनी केला.
हे ही वाचा:
लसीकरणाबाबत अफवांना बळी पडू नका
दिल्लीतील लॉकडाऊन एका आठवड्याने वाढला
आंध्र, कर्नाटकने ऑक्सिजन उचलला, ठाकरे सरकारची फक्त तोंडपाटीलकी
३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती- सेरो सर्वे
देशमुखांची चौकशी व्हावी हे न्यायालयाला वाटले. त्यामुळेच न्यायालयाने सीबीआयमार्फत चौकशीचे आदेश दिले. त्यात महाविकास आघाडीच्या पोटात दुखायचे कारण काय? तुमचे हात साफ असतील तर सुटाल, असं सांगतानाच राष्ट्रवादीच एवढी बैचेनी का वाढली आहे हेच कळत नाही. उद्या आपलंही नाव येईल म्हणून राष्ट्रवादीवाले बिथरले आहेत. चौकशी झाली तर कुठपर्यंत नावं जातील याची त्यांना भीती वाटतेय. त्यामुळेच राष्ट्रवादीला चौकशी होऊ नये असं वाटतं, असा दावाही त्यांनी केला.