भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांची केंद्रीय समन्वयक माध्यम विभाग या पदावर संघटनात्मक नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे आणि आमदार अतुल भातखळकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्तीचे पत्र आमदार भातखळकर यांना दिले आणि त्यांचे अभिनंदन केले.
हे ही वाचा:
अमित शहांनंतर शिंदे शिवसेनेचा उद्धव ठाकरेंवर प्रहार !
‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब
‘मोदी ३.0 सरकार’च्या अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महाग?
आमदार अतुल भातखळकर हे सडेतोड भाष्य करण्यासाठी ओळखले जातात. नुकत्याच पुण्यात झालेल्या भाजपाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सडेतोड भूमिका व्यक्त करा, विरोधकांना ठोकून काढा अशी परवानगी दिली. त्याअर्थाने परखड मते मांडणाऱ्या आमदार अतुल भातखळकरांची निवड ही महत्त्वाची मानली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांना खरमरीत भाषेत उत्तर देण्यासाठी भाजपाने तयारी केली असून त्यादृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व आले आहे.