छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीबरोबरच ते सुराज्य असावे हा कटाक्ष ठेवला. त्यासाठी स्वराज्याच्या अर्थकारणाला त्यांनी दिशा दिली, त्याला शिस्त लावली. त्यामुळेच सुराज्य अवतरले. एक अर्थभान असलेला राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख जगभरात तयार झाली. याचविषयावर पीएचडी केलेले डॉ. अजित आपटे यांच्याशी साधलेला हा दीर्घसंवाद.