25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषबिग बॉस ३ ओटीटी शो तातडीने बंद करा

बिग बॉस ३ ओटीटी शो तातडीने बंद करा

महाराष्ट्रात रिअलिटी शोच्या नावाखाली अश्लिलता खपवून घेणार नाही : शिवसेना

Google News Follow

Related

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील रिअलिटी शो बिग बॉस सिजन ३ मध्ये अश्लिलता दाखवली जात असून हा शो तातडीने बंद करावा, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्ता आमदार ड़ॉ. मनिषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे.

आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी आज शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ओटीटीवर दाखवल्या जाणाऱ्या बिग बॉस सिजन ३ मधील १८ जुलै २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बीभत्स आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे दाखवल्याचे पोलीस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. याच शो दरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांना कौटुंबिक नात्याचा सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली असल्याची टीका ड़ॉ. कायंदे यांनी केली.

हेही वाचा..

नागरी सेवांमध्ये अपंगत्व कोटा कशाला हवा ?

२०२५ च्या आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ६.५ ते ७ टक्के राहणार

आता सरकारी कर्मचाऱ्यांनाही संघाच्या शाखेत जाता येणार

बासुरी स्वराज यांच्याविरोधातील याचिकेत चुकाच चुका !

डॉ. कायंदे पुढे म्हणाल्या की, बिग बॉस ३ या शोने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुलंही हा शो पाहतात. अरमान मलिक जे बोलत आहेत त्याचा परिणाम लोकांच्या मनावर होतो. त्यामुळे हा शो तातडीने बंद करावा. या शोचे निर्माते आणि प्रक्षेपण करणाऱ्या कंपनीच्या सीईओंवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी. सदर व्हिडिओ विविध सोशल मीडियावर देखील वायरल झाला आहे का याची तपासणी करावी, हा गुन्हा ज्या ज्या कायद्याखाली येत असेल ते सर्व आयपीसीचे कलम सदर शो मध्ये भाग घेणाऱ्या लोकांवर व शोच्या सीईओवर लावण्यात यावे, अशी लेखी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर OTT लाही सेन्सॉरच्या कक्षेत आणण्याची मागणी करण्याबाबत केंद्रीय सूचना आणि प्रसारण मंत्र्यांची भेट घेणार असल्याचे डॉ. कायंदे यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा