24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषहवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब

हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे मत

Google News Follow

Related

हवामान बदल हा कधीही स्फोट होऊ शकणारा टाईम बॉम्ब आहे आणि मानवजातीच्या अस्तित्वावरचे हे संकट आहे असा सावधगिरीचा इशारा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला आहे. पूर्वीच्या काळी हिरवागार स्वर्गासमान असलेल्या आपल्या ग्रहावर आता भूतकाळाची सावली देखील राहिलेली नाही.नैसर्गिक साधनसंपत्तीचे बेपर्वाईने केलेले शोषण आणि जंगलतोड या कारणांमुळे हवामानात झालेल्या बदलाच्या कारणाने आपला ग्रह आता मोठ्या आपत्तीच्या टोकावर उभा आहे, ते म्हणाले. मानव जमात कडेलोटाच्या टोकावर उभी आहे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

‘जैविक उर्जा: विकसित भारताकडे नेणारा मार्ग’ या विषयावर आज नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय हवामानविषयक शिखर परिषदेच्या समारोप सत्रात बीजभाषण करताना उपराष्ट्रपती बोलत होते. ते म्हणाले की “आकस्मिकपणे येणाऱ्या संकटांसाठी आपल्याकडे पर्यायी योजना नाही, पृथ्वीशिवाय दुसरा कोणताही ग्रह नाही आणि म्हणून आपल्या ग्रहाचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.

हेही वाचा..

विशाळगड हिंसाचाराशी संबंधित वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी एकाला अटक 

ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलातील २४ जवानांचा समावेश

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपी भावेश भिंडे विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करणार

मुंबईतील ग्रँट रोड परिसरात म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला

प्रदीर्घ काळ पडणारा दुष्काळ, तीव्रतेने पसरणारे वणवे आणि अभूतपूर्व स्वरुपाची चक्रीवादळे अशासारखे हवामान बदलाचे विनाशकारी प्रकटीकरण अधोरेखित करत उपराष्ट्रपती धनखड यांनी ठामपणे सांगितले की “असे बदल केवळ असुरक्षित लोकसंख्येला धोक्यात टाकत नाहीत तर ते जैवविविधता आणि अन्न सुरक्षा यांच्यासाठी देखील धोका निर्माण करतात आणि आपली नैसर्गिक साधनसंपत्ती तसेच कृषी प्रणाली यांच्यावर लक्षणीय प्रमाणात ताण आणतात आणि त्यायोगे सामुदायिक शक्तीपाताला कारणीभूत ठरतात. आपल्या जुन्या मूल्यांचा संदर्भ देत,“निसर्गासोबत सुसंवादी सह अस्तित्व आणि आपल्या पर्यावरणाप्रती मनापासून आदर बाळगणे हे भारताच्या नागरी संस्कृतीच्या मूल्यांचे आंतरिक पैलू आहेत” याकडे उपराष्ट्रपतींनी निर्देश केला.

हवामानाप्रती न्याय्य वर्तणुकीवर भर देऊन उपराष्ट्रपती धनखड यांनी सांगितले की हवामान बदलाचे संकट दुर्लक्षित तसेच असुरक्षित समुदायांना व्यस्त प्रमाणात प्रभावित करत असताना हवामानाप्रती न्याय्य वर्तणुक हा आपला मार्गदर्शक ध्रुव तारा असला पाहिजे. हवामान बदलाच्या परिणामांची सर्व सीमा ओलांडून सर्वत्र पुनरावृत्ती होत आहे हे सत्य अधोरेखित करत, उपराष्ट्रपती धनखड यांनी सर्व देशांची सरकारे, कॉर्पोरेट विश्वातील प्रमुख नेते आणि सर्वच लोकांसह सगळ्या हितसंबंधीयांना या संकटाचा सामना करण्यासाठी सामुदायिक कृती करण्याचा आग्रह व्यक्त केला.

एक पेड माँ के नाम’ या अभियानात असलेल्या क्रांतिकारक क्षमतेची नोंद घेत ते म्हणाले की हे केवळ भावनात्मक आवाहन किंवा घोषणा नव्हे तर ते एक क्रांतिकारी पाऊल आहे. या उपक्रमामुळे दर वर्षी १.४ अब्ज लोक प्रत्येकी एक झाड लावतील. याचा फार मोठा सकारात्मक आणि चढत्या भाजणीत वाढणारा प्रभाव पडेल. तो आपल्याला आपल्या अस्तित्वावरील संकटाशी लढण्यात मदत करेल, ही अशी समस्या आहे जी आपणच नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण आणि जंगलतोड करून स्वतःच निर्माण केली आहे,”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा