महाराष्ट्रातील कोल्हापुरातील विशाळ गडावर झालेल्या हिंसक घटनेबाबत अंधेरीतील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद मासुम रजा शमीम शेख (२५ वर्षे) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोन धार्मिक गटांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ प्रसारित केल्याच्या आरोपावरून भारतीय न्याय संहिता कलम १९६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापुरात असलेल्या विशाळगड किल्ल्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान दगडफेक आणि मारामारीमुळे वादंग निर्माण झाले असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तुकाराम कोयंडे यांनी सांगितले. hasan_rizvi99 या Instagram वर हा वादग्रस्त व्हिडिओ १६ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास अपलोड करण्यात आला होता. याबाबत फिर्यादी देविदास खेळणार (वय ४०) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपी मोहम्मद मासुम रजा शमीम शेख याला अटक केली आहे.
हे ही वाचा:
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी आरोपी भावेश भिंडे विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल करणार
मुंबईतील ग्रँट रोड परिसरात म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला
राहुल गांधी यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनावे
हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना अटक !
या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की, १६ जुलै रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास hasan razvi99 या इंन्स्टाग्राम आयडी धारकाने इंन्स्टाग्राम या सोशल माध्यमावर कोल्हापुर जिल्हातील विशाळ गडावरील झालेल्या निष्कासन कारवाईच्या प्रसंगावरून दोन धार्मिक गटात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने व्हीडीओ प्रसारीत करून दोन धार्मिक गटात शत्रुत्व वाढविणे आणि एकोपा टिकवण्यास बाधक अशी कृत्य केले म्हणून hasan_razvi99 या इन्सटा आयडी धारकाविरोधात सरकार तर्फे फिर्यादी देविदास खेळणार यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला आज अटक करण्यात आली आहे.
आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीपी कुलाबावाला आणि न्यायमूर्ती फिरदोश पूनीवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आजपासून विशाळगड किल्ल्याभोवती कोणतेही निवासी किंवा व्यावसायिक बांधकाम पाडल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे.