30 C
Mumbai
Friday, September 20, 2024
घरविशेषहरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना अटक !

हरियाणातील काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना अटक !

अवैध खाण प्रकरणी ईडीची कारवाई

Google News Follow

Related

बेकायदेशीर खाण प्रकरणी ईडीच्या पथकाने मोठी कारवाई करत हरियाणातील सोनीपत येथून काँग्रेस आमदार सुरेंद्र पनवार यांना अटक केली आहे. पनवार यांच्यावर यमुनानगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन केल्याचा आरोप आहे. सुरेंद्र पनवार यांना रिमांडसाठी अंबाला येथील विशेष न्यायालयात नेण्यात येत आहे.

हे प्रकरण यमुनानगर भागातील सिंडिकेटद्वारे सुमारे ४००-५०० कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आहे. हरियाणा पोलिसांनी अवैध खाणकाम प्रकरणी पनवार आणि इतरांविरुद्ध अनेक एफआयआर दाखल केले होते त्यानंतर गेल्या वर्षी ईडीने आपल्या हाती हा तपास घेतला. या वर्षी जानेवारीमध्ये ईडीने आयएनएलडीचे माजी आमदार दिलबाग सिंह, सुरेंद्र पनवार आणि इतर सहकाऱ्यांच्या २० ठिकाणी घरांवर छापे टाकले होते. या प्रकरणी ईडीने यापूर्वीच दिलबाग सिंग आणि कुलविंदर सिंग यांना अटक केली आहे. त्यानंतर आता सुरेंद्र पनवार यांना अटक केली आहे.

हे ही वाचा:

मुंबईला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला !

राहुल गांधी यांनी लोकसंख्या नियंत्रणाचे ब्रँड ॲम्बेसेडर बनावे

बांगलादेशात आरक्षण वाद पेटला, कर्फ्यू लागू, निदर्शनांमध्ये १०५ जण ठार !

लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ‘मविआ’ कार्यकर्त्यांकडे देऊ नका

 

हरियाणा पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआर आणि बेकायदेशीर खाण क्रियाकलापांशी संबंधित राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या आदेशांच्या आधारे ईडीने तपास सुरू केला होता. तपासात यमुनानगर जिल्ह्यातील विविध स्क्रीनिंग प्लांट मालक आणि स्टोन क्रशरद्वारे खनिजांचे अवैध उत्खनन आणि विक्री उघड झाली. यामध्ये योग्य ई-वे बिल तयार न करणे किंवा ओळख टाळण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करणे यासारख्या चोरीच्या डावपेचांचा समावेश होता.

ईडीच्या शोध मोहिमेदरम्यान पथकाने ५.२९ कोटी रुपये रोख, १.८९ कोटी रुपये किमतीचे सोने, ०२ वाहने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे (देशी आणि परदेशी दोन्ही) आणि इतर दोषी कागदपत्रे जप्त केली आहेत. याशिवाय परिसरातून अवैध शस्त्रे, दारूगोळा आणि जादा दारू जप्त करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा