32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषदिसली रायगडची पॉवर; अमृता भगत ठरली 'बेस्ट लिफ्टर'

दिसली रायगडची पॉवर; अमृता भगत ठरली ‘बेस्ट लिफ्टर’

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिळवले यश

Google News Follow

Related

दक्षिण आफ्रिका येथे ०५ ते १३ जुलै २०२४ या कालावधीत या दरम्यान आशिया पॅसिफिक आफ्रिकन क्लासिक आणि इक्विप पॉवरलिफ्टिंग स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रायगडची शेलू वांगणीची रहिवासी अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत हिने ४७ किलो वजनी गटात भारताचे प्रतिनिधित्व केले.

हे ही वाचा:

मुस्लीमांना हव्या विधानसभेच्या ३२ जागा; ठाकरे-पवार मनावर घ्या…

उज्जैनमध्ये निवृत्त सैनिकाचा भाजप नेत्यावर गोळीबार !

पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहभागी होणार भारतीय लष्कराचे प्रशिक्षणार्थी ‘श्वान’ !

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमधून १०८८ कोटी रुपयांची तरतूद

१३ जुलै रोजी झालेल्या या स्पर्धेत अमृता भगत हिने जूनियर इक्विप गटात स्कॉट प्रकारात १२२.५ किलो वजन, बेच प्रेस प्रकारात ६७.५ किलो वजन, आणि डेडलीफ्ट प्रकारात १३२.५ किलो वजन घेतले. तिने एकूण ३२२.५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. त्याचबरोबर “एशियन बेस्ट लिफ्टर”हा किताब सुद्धा प्राप्त केला. अमृता भगतची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतीआणि तिने पदकांची परंपरा कायम राखली. रायगडचे माजी राष्ट्रीय खेळाडू माधव गोविंद पंडित यांनी या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला. अमृता भगत हिला खोपोली मधील विक्रांत अनिल गायकवाड यांचे मार्गदर्शन असून ती अतिशय खडतर मेहनत घेते. अमृताचा दोनच दिवसापूर्वी मायदेशात आगमन झाले. त्यावेळी तिचे स्वागत तिचे वडील ज्ञानेश्वर भगत प्रशिक्षक विक्रांत गायकवाड यांनी केले आणि तिचे खास अभिनंदन केले.

रायगडच्या महिला खेळाडूला पहिल्यांदाच आशियाई स्पर्धेत किताब मिळाला आहे. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे क्रीडा प्रेमी अध्यक्ष आणि माजी राज्य खेळाडू गिरीश शरद वेदक यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर इतर पदाधिकारी सहसचिव सचिन भालेराव, खजिनदार राहुल गजरमल, सदस्य संदीप पाटकर, सुभाष टेंबे(माणगाव), दत्तात्रय मोरे(महाड), कार्याध्यक्ष यशवंत मोकल (पनवेल), उपाध्यक्ष श्रीनिवास भाटे(कर्जत) आणि सचिव अरुण पाटकर यांनी तिचे खास अभिनंदन केले आहे. अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत यांनी मिळवलेल्या यशाबाबत त्यांचा योग्य तो गौरव करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा