29 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषगडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, १२ माओवाद्याना कंठस्नान !

अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त

Google News Follow

Related

छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात १२-१५माओवादी तळ ठोकून असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर आज सकाळी १० वाजता गडचिरोली येथून एक ऑपरेशन सुरू करण्यात आले ज्यामध्ये Dy SP Ops च्या नेतृत्वाखाली सात C-६० पथकांना छत्तीसगड सीमेजवळील वांडोली गावात पाठवण्यात आले.

त्यावेळी सदर परिसरात दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत ०६ तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. त्यानंतर परिसरात केलेल्या शोध अभियानात आतापर्यंत १२ माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच आतापर्यंत ३ AK47, २ INSAS, १ कार्बाइन, १ SLR यासह ०७ ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मृत माओवाद्यांपैकी एक ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम @ विशाल आत्राम,असल्याची माहिती मिळाली माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरात शोध सुरू आहे.

हे ही वाचा:

पोलीस कोठडीचे गज वाकवून आरोपीचे पलायन, सांताक्रूझ वाकोल्यातील घटना !

निवडणुकीच्या लगबगीत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बिजापूर जिल्ह्यात आयईडी स्फोटात दोन जवान हुतात्मा

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईला महाडमधून अटक

C-६०  चे एक पोलीस उप निरीक्षक आणि एक जवान हे गोळी लागून जखमी झाले आहेत . ते धोक्याबाहेर असून त्यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशस्वी ऑपरेशन अभियानासाठी C६०  कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना ५१ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा