अमेरिकेत लवकरच निवडणुका लागणार असून त्यासाठीची लगबग सुरू झाली आहे. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ऐन निवडणुकीच्या धामधुमीत करोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात ही माहिती दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे डॉक्टर केविन ओ कॉनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, जो बायडेन यांच्यात करोनाची काही सौम्य लक्षणं दिसत आहेत. त्यांना सर्दी आणि खोकला झाला असून त्यांना बराच थकवाही जाणवतो आहे. त्यांचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना अँटी व्हायरल डोस पॅक्सलोव्हिड दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती बरी आहे. व्हाइट हाऊसनेही याबद्दल माहिती दिली आहे असं डॉक्टर म्हणाले.
बायडन यांनी ट्वीट करत ,माहिती दिली आहे. “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र, आता ठीक वाटतं आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या शुभेच्छा माझ्यासह आहेत. मला लवकरच बरं वाटेल याची मला खात्री आहे. तसंच मी सध्या स्वतःला क्वारंटाइन करतो आहे, मात्र अमेरिकेतल्या नागरिकांसाठी जी कामं करायची आहेत ती मी करत राहणार आहे.”
हे ही वाचा:
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना ही ‘देवाची करणी’; मुख्य आरोपी भावेश भिंडेचा अजब दावा
दुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला ‘तीन तलाक’ !
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार
लास वेगास युनिडोसयूएस येथील संमेलनात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भाषण करणार होते. त्याआधी त्यांची करोना चाचणी करण्यात आली. ज्यानंतर त्यांना करोना झाल्याचा अहवाल आला. सध्या त्यांना करोनाची सौम्य लक्षणं आहेत. व्हाइट हाऊसचे सचिव पियरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्राध्यक्ष बायडेन आता डेलावेयरला परतणार आहेत आणि तिथे ते होम क्वारंटाइन असतील.