30 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषदुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला 'तीन तलाक' !

दुबईच्या राजकुमारीने इंस्टाग्रामवर पतीस दिला ‘तीन तलाक’ !

पोस्टची सर्वत्र चर्चा

Google News Follow

Related

दुबईची राजकुमारी शेखा महारा बिंत मोहम्मद बिन रशीद अल मकतूम उर्फ ​​शेखा महारा हिने तिच्या पतीपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली आहे. राजकुमारीने तिचा पती शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन मना अल मकतूम याला इंस्टाग्रामवर पोस्ट लिहून घटस्फोट घेतला आहे. राजघराण्यातील सदस्याने अशा प्रकारे घटस्फोटाची घोषणा करण्याची यूएईमध्ये ही बहुधा पहिलीच वेळ आहे.

यूएईचे उपराष्ट्रपती व दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी राजकुमारी शेखा महरा यांच्या घटस्फोटाच्या इंस्टाग्राम पोस्टने सर्वत्र खळबळ उडाली आहे. शेखा मेहरा यांचे इन्स्टा अकाउंट कोणीतरी हॅक केले असेल, असे सुरवातीला लोकांना वाटत होते. मात्र, नंतर पोस्टची पुष्टी झाली की, राजकुमारीने खरोखरच तिच्या पतीशी संबंध तोडण्याची घोषणा केली होती.

हे ही वाचा:

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्यास होणार फौजदारी कारवाई होणार

हरियाणात अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण, बिनव्याजी कर्जही मिळणार !

अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने ठेवला राखून

हिंदूंनो ऐका आणि थंड बसा…

राजकुमारी शेखा महराने इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘प्रिय पती, तू तुझ्या इतर साथीदारांसोबत व्यस्त आहेस. म्हणून मी तुला तलाक देत आहे. मी तलाक देते , मी तलाक देते. मी तलाक देते आहे. काळजी घे. तुझी एक्स पत्नी, अशी पोस्ट करत राजकुमारीने घटस्फोट घेतल्याचे म्हटले. गेल्यावर्षीच राजकुमारीने शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूमशी लग्न केले होते. त्यानंतर एका वर्षांतच तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. दरम्यान, राजकुमारीच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.

इस्लामिक कायद्यात झटपट घटस्फोटाच्या प्रथेला “तलाक-ए-बिद्दत” असे म्हटले जाते. एखाद्या विवाहित पतीने तीन तलाक असा उल्लेख केला तर पत्नीपासून त्याचा घटस्फोट झाल्याचे मानले जाते. इस्लामिक कायद्यानुसार केवळ विवाहित युवकालाच असा अधिकार असल्याचे म्हटले जाते. विवाहित पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर तिला न्यायालयाचा आधार घ्यावा लागतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा