सध्या राज्यात विशाळगडावरील अनधिकृत बांधकामांचा विषय चांगलाच चर्चेत आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या अतिक्रमणावरुन हिंसक आंदोलन देखील झालं. या अतिक्रमणाविरोधात संभाजी महाराज छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान, दहशतवादी यासीन भटकळ हा विशाळगडावर राहिला होता असा मोठा गौप्यस्फोट संभाजी महाराज छत्रपती यांनी केला होता. या प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं विधान केलं आहे.
इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकळ हा विशाळगडावर कधीपासून होता? कोणाकडे राहायला होता? याची सखोल चौकशी करणार असल्याचे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. त्यासोबतच त्यावेळच्या पोलीस अधिकाऱ्यांची देखील चौकशीची होणं गरजेचं आहे, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात वारंवार घडणाऱ्या दंगली बाबत सर्वांच्या चौकशीची गरज त्यांनी व्यक्त केली. सतेज पाटील यांनी महिन्याभरापूर्वी दंगली बाबत केलेल्या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली. दरम्यान, हसन मुश्रीफ म्हणाले की, विशाळगडावरील आंदोलन शांततेत करण्याचा शब्द देण्यात आला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीस गाफिल राहिले का? नेमकं काय झालं? याचीही चौकशी होईल असं त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेच्या ठिकाणाहून AK-47 रायफल बाळगणाऱ्याला अटक
ओमानच्या किनारपट्टीलगत तेलाचा टँकर उलटून १३ भारतीयांसह १६ जणांचा क्रू बेपत्ता
चंद्रभागेच्या तिरी, दुमदुमली पंढरी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न
संभाजीराजे म्हणाले होते की, यासिन भटकळ हा अतिरेकी इंडियन मुजाहिदीन संघटनेचा सदस्य आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी आहे. भारतातील विविध बॉम्बस्फोटातील तो भाग होता. हा भटकळ विशाळगडला राहिला होता ही त्याची नोंद आहे.