अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा जगभरातून तीव्र निषेध केला जात आहे. निवडणूक रॅलीला संबोधित करत असताना ट्रम्प यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यातून ट्रम्प थोडक्यात बचावले. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी पहिली मुलाखत दिली आहे. ते म्हणाले की, मला या ठिकाणी राहायचे नको होते, मी मरायला हवे होते, पण मला असे वाटते की ‘देवाने मला वाचवले’.
न्यूयॉर्क पोस्टला मुलाखत देताना ते म्हणाले की, त्या गोळीने माझा जीव घेतला असता. ते पुढे म्हणाले, माझ्यावर जेव्हा हल्ला झाला जेव्हा एक आश्चर्याची गोष्ट घडली. ती म्हणजे, हल्ल्यावेळी मी फक्त माझे डोकेच फिरवले नाही तर ते अगदी योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात वळवले, अन्यथा माझ्या कानाला चाटून गेलेली गोळी माझा जीव घेऊ शकली असती. ते पुढे म्हणाले, हल्ल्यानंतर देखील मला माझे भाषण चालू ठेवायचे होते. मात्र, सुरक्षा रक्षकांनी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरला. यादरम्यान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी फोन केल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मुंबईत विकासकामांना गती; पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेले प्रकल्प कोणते? काय होणार फायदा
यासिन भटकळ विशाळगडावर राहिला, हेच का तुमचे पुरोगामित्व?
‘कॅम्लिन’ उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा सुभाष दांडेकर यांचे निधन
आसाममध्ये ५० लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व मिळेल हा दावा ठरला फोल
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला होता. हल्लेखोराने काही उंचीवरून त्यांच्यावर गोळीबार केला होता. मात्र, गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली आणि ते थोडक्यात बचावले. सध्या माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने (एफबीआय) हल्लेखोराची ओळख २० वर्षीय तरुण थॉमस मॅथ्यू म्हणून केली आहे. गोळीबारानंतर लगेचच स्नायपरने त्याला ठार केले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.