फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीची अर्जेंटिना थांबण्याचे नाव घेत नाहीये. फुटबॉलमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्जेंटिनाचा दबदबा वाढत चालला आहे. आता अर्जेंटिनाने कोपा अमेरिका २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत कोलंबियाचा पराभव करून कोपा अमेरिका ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. कोपा अमेरिकेतील अर्जेंटिनाचा हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी २०२१ च्या स्पर्धेत अर्जेंटिनाने अंतिम फेरीत ब्राझीलचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
२०२४ चा कोपा अमेरिकाचा अंतिम सामना सोमवारी (१५ जुलै) रोजी भारतीय वेळेनुसार फ्लोरिडा येथील हार्ड रॉक स्टेडियमवर खेळला गेला. सामना खूपच रोमांचक झाला. कारण विजयी गोल फूट टाइममध्ये नाही तर अतिरिक्त वेळेत झाला. ९० मिनिटे बाकी असताना दोन्ही संघांना गोलचे खातेही उघडता आले नाही. अर्जेंटिनाने हा सामना १-० असा जिंकला. सामन्यातील एकमेव गोल ११२ व्या मिनिटाला (अतिरिक्त वेळेत) झाला, जो अर्जेंटिनाच्या लॉटारो मार्टिनेझने केला. हा त्याचा स्पर्धेतील पाचवा गोल होता, ज्यासाठी त्याला गोल्डन बूटचा किताबही देण्यात आला.
हे ही वाचा:
राज्यातील वातावरण शांत व्हावे म्हणून पवारांना भेटलो !
पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, नाव बदलून यूपीएससीची दिले दोन अटेंम्प्ट !
वजन कमी करण्यासाठी डबाच न खाण्याचा केजरीवाल फॉर्म्युला
मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !
अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी दुखापतीमुळे संपूर्ण सामना खेळू शकला नाही. सामन्याच्या ६६व्या मिनिटाला मेस्सीच्या पायाला दुखापत झाली, त्यामुळे त्याला बाहेर जावे लागले. दुखापतीमुळे तो बेंचवर बसूनही रडू लागला. मात्र, संघातील उर्वरित खेळाडूंनी मेस्सीची अनुपस्थिती जाणवू दिली नाही आणि सामना जिंकला.