मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यातील तंग झालेले वातावरण शांत व्हावे. शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी यामध्ये पुढाकार घ्यावा, हे सांगण्यासाठी आपण शरद पवार यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, अशी माहिती ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. आज सकाळी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. भेटीमागे कोणतेही राजकारण नाही केवळ सामाजीक प्रश्न म्हणून आपण भेटल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा..
पूजा खेडकरचा आणखी एक कारनामा, नाव बदलून यूपीएससीची दिले दोन अटेंम्प्ट !
मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !
पुण्यात ‘झिका’चा वाढता प्रादुर्भाव; २३ जणांना लागण
आषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन
मंत्री भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर ते दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही प्रमुख लोकांशी चर्चा करून हा प्रश्न कसा सोडवता येईल, ते पाहू असे शरद पवार यांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले. शरद पवार हे सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत यावर पवार म्हणाले की मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्याशी मंत्र्यांनी काय चर्चा केली हे माहिती नसल्यामुळे आपण आलो नाही असेही पवार यांनी सांगितल्याचे भुजबळ म्हणाले.
मंत्री भुजबळ आणि शरद पवार यांच्यात सुमारे दीड तास या विषयाला धरून चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत साधक बाधक झाली असून या विषयावर शरद पवार काही प्रमुख लोकांशी बोलणार असल्याचे भुजबळ म्हणाले. या भेटीपूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशी फोनवरून बोललो होतो, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले.