वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. यूपीएससी परीक्षेचे प्रयत्न संपल्यानंतर पूजा खेडकर यांनी आपल्या नावात बदल करून परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांनी ११ वेळा यूपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, पूजा खेडकर त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी यूपीएससीची ११ वेळा परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. २०१९-२०२० पर्यंत त्यांनी खेडकर पूजा दिलीपराव या नावाने यूपीएससीची परीक्षा दिली होती. तर २०२१-२०२२ ला नावात बदल करत पूजा मनोरमा दिलीप खेडकर या नावाने त्यांनी परीक्षा दिल्याची माहिती समोर आली आहे. ओबीसी प्रवर्गातून त्यांना ९ वेळा यूपीएससीची परीक्षा देता येत होती. त्यानुसार त्याचे परीक्षेचे अटेंम्प्ट २०१९-२० ला संपल्याचे समजत आहे. दरम्यान, पूजा खेडकर यांचे एकामागून एक असे अनेक कारनामे समोर येत आहेत. आता या नवीन कारनाम्याने त्यांच्यावर यासंदर्भात कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
हे ही वाचा:
मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींचा भाजपात प्रवेश !
पुण्यात ‘झिका’चा वाढता प्रादुर्भाव; २३ जणांना लागण
आषाढी एकादशीपूर्वीच वारकऱ्यांना सरकारकडून भेट; पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मिळणार पेन्शन
१५ तासांहून अधिक काळापासून कोकण रेल्वे ठप्प! प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले
दरम्यान, पूजा खेडकर यांची ऑडी कार देखील पुणे पोलिसांनी जप्त केली आहे. वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे. खेडकर यांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून खासगी कारवर व्हीआयपी नंबर प्लेटसह लाल आणि निळ्या रंगाचा दिवा लावला होता. तसेच परवानगी नसतानाही गाडीवर ‘महाराष्ट्र सरकार’ असे लिहिलेले होते. याव्यतिरिक्त वाहतूक उल्लंघन केल्याप्रकरणी वाहनावर २६,००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.