27 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेष१५ तासांहून अधिक काळापासून कोकण रेल्वे ठप्प! प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले

१५ तासांहून अधिक काळापासून कोकण रेल्वे ठप्प! प्रवासी रेल्वे स्थानकात अडकले

रेल्वे रुळांवर दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद; अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द

Google News Follow

Related

राज्यात पावसाची दमदार हजेरी असताना कोकणात मात्र पावसाने हाहाःकार माजवला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह इतरत्र अनेक भागात पावसाचे थैमान सुरू आहे. अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून याचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. कोकण रेल्वे गेल्या साधारण १५ तासांपासून ठप्प झाली असून अनेक रेल्वे गाड्या या मार्गावरील स्थानकांवर उभ्या आहेत.

काही ठिकाणी रेल्वे रुळांवर दरड कोसळल्यामुळे मार्ग बंद झाला आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर रात्र काढावी लागली. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काहींचे मार्ग बदलले आहेत. दरम्यान पुढील चार दिवस पुन्हा कोकणासह राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज आहे. सातारा, रत्नागिरी जिल्ह्यास पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. राज्यातील इतर भागांत ऑरेंज अन् यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, नागपूर, रायगड, गडचिरोली भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. १८ जुलै पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. त्यामुळे गेल्या साधारण १५ तासांपासून कोकण रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवरील दरड बाजूला करण्याचे काम सुरु आहे. मात्र, संपूर्ण रेल्वेचे वेळापत्रक पूर्ववत होण्यास वेळ लागणार आहे. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखलाचे साम्रज्य आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या आठ गाड्या रद्द, तर १२ ट्रेन इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. दरम्यान, रत्नागिरी स्थानकाहून विशेष एसटी बसेस पनवेलच्या दिशेने सोडण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पेनने इंग्लडला नमवत युरो चॅम्पियनशिप जिंकली

अब की बार १० करोड पार !

पोटगीबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल, सर्व पीडित मुस्लिम महिलांना लागू होईल काय?

साताऱ्याच्या ‘चंदन वंदन गडावर’ही मजार, दर्गा !

कोकण रेल्वेच्या रद्द झालेल्या एक्सप्रेस ट्रेन

  1. ट्रेन क्रमांक ५०१०३ = दिवा – रत्नागिरी पॅसेंजर
  2. ट्रेन क्रमांक १२१३३ = मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जं. एक्सप्रेस
  3. ट्रेन क्रमांक २०१११ = मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ‘कोकण कन्या एक्स्प्रेस’
  4. ट्रेन क्रमांक ११००३ = मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ‘तुतारी एक्स्प्रेस’
  5. ट्रेन क्रमांक ५०१०४ = रत्नागिरी – दिवा पॅसेंजर
  6. ट्रेन क्रमांक १२०५१ = मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ‘जनशताब्दी एक्सप्रेस’
  7. ट्रेन क्रमांक १०१०५ = दिवा – सावंतवाडी रोड एक्सप्रेस
  8. ट्रेन क्रमांक ५०१०७ = सावंतवाडी रोड – मडगाव
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा