28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
घरविशेष१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पेनने इंग्लडला नमवत युरो चॅम्पियनशिप जिंकली

१२ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर स्पेनने इंग्लडला नमवत युरो चॅम्पियनशिप जिंकली

चार वेळा युरो कप उंचावणारा स्पेन हा पहिला देश ठरला

Google News Follow

Related

स्पेनने युरो कपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव करून चौथ्यांदा युरोपियन चॅम्पियनशिपवर नाव कोरले. स्पर्धा जिंकण्यासोबतच स्पेनने इतिहासही रचला आहे. सर्वाधिक चार वेळा युरो कप उंचावणारा स्पेन हा पहिला देश ठरला हे. याआधी स्पेनने १९६४, २००८ आणि २०१२ मध्ये युरो कपचे विजेतेपद पटकावले होते. स्पेनने सर्वाधिक चार युरो कप जिंकत जर्मनीलाही मागे टाकले आहे.

युरो कप २०२४ चा अंतिम सामना हा चुरशीचा झाला स्पेन आणि इंग्लंड यांच्यात खेळवला गेला. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली ज्यामध्ये अखेरीस स्पेनच्या संघाने अंतिम सामना २-१ अशा फरकाने जिंकला. युरो कप २०२४ चा अंतिम सामना १५ जुलै रोजी जर्मनीचे राजधानीचे शहर बर्लिन येथे स्पेन आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला.

स्पेन आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामन्यात पहिला गोल हा ४७व्या मिनिटाला झाला. ज्यामध्ये स्पॅनिश खेळाडू निकोने पहिला गोल केला. या गोलसह स्पेनने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली होती, परंतु यानंतर इंग्लंडने पुनरागमन केले आणि सामन्याच्या ७३व्या मिनिटाला पाल्मरने गोलरक्षकाला चुकवत गोल केला, त्यामुळे सामना १-१ असा बरोबरीत आला. सामना १-१ असा बरोबरीत आणत इंग्लंडने अतिशय आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. पण, खेळाच्या ८६व्या मिनिटाला स्पेनचा अनुभवी खेळाडू ओयारझाबालने गोल करून संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ९० मिनिटांचा खेळ संपल्यानंतर अतिरिक्त वेळेसाठी दिलेल्या ४ मिनिटांतही इंग्लंडचा संघ एकही गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि स्पेनने १२ वर्षांनंतर युरो कप जिंकला.

हे ही वाचा:

अब की बार १० करोड पार !

पोटगीबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल, सर्व पीडित मुस्लिम महिलांना लागू होईल काय?

साताऱ्याच्या ‘चंदन वंदन गडावर’ही मजार, दर्गा !

पोटनिवडणुकात विरोधकांनी आपल्या जागा राखल्या, भाजपाला हरवले नाही!

तब्बल १२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर स्पेनने युरो चॅम्पियनशिप जिंकली. स्पेनने चौथ्यांदा युरो कपचे विजेतेपद पटकावले आहे. इतर कोणत्याही संघाने आतापर्यंत इतक्या वेळा युरो कप जिंकलेला नाही. २०२० च्या युरो कपच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर आता इंग्लंडला २०२४ च्या युरो कपच्या फायनलमध्येही पराभवाला सामोरे जावे लागले. इंग्लंडला आतापर्यंत युरो चॅम्पियनशिप जिंकण्यात यश मिळालेले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा