उत्तराखंडच्या चमोली- गढवाल जिल्ह्यात हिमकडा कोसळून दोन लोकांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. भारत-चीन सीमेनजीक ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ४च्या सुमारास घडल्याचे सैन्यातर्फे सांगण्यात आले आहे
अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने जागोजागी रस्ता तुटला आहे. त्यामुळे जोशीमठ येथील बॉर्डर रोड टास्क फोर्सने (बीआरटीएफ) या रस्तादुरूस्तीचे काम सुरू केले आहे. त्याबरोबरच हिमकडा कोसळल्यानंतर भारतीय सैन्याने तातडीने बचावकार्याला सुरूवात देखील केली. त्यामुळे २९१ मजूरांचा जीव वाचवण्यात सैन्याला यश आले आहे. या मजूरांना सैन्याच्या कँपमध्ये हलविण्यात आले आहे. बचावकार्य अजून चालू असल्याची माहिती भारतीय सैन्यातर्फे देण्यात आली.
हे ही वाचा:
शेतकऱ्याचा मुलगा झाला भारताचा सरन्यायाधीश
मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला, नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती- सुजय विखे पाटील
ट्रम्पनंतर बायडनचेही ‘अमेरिका फर्स्ट’
कोविड जगातील सर्वोच्च शिखरापर्यंत
सुमना या गावापासून चार किलोमीटर दूर हिमकडा कोसळल्यानंतर लगेचच भारतीय सैन्याने बचावकार्याला सुरूवात केली होती असे भारतीय सैन्यातर्फे सांगण्यात आले. जोशीमठ ते रिमखीम पट्ट्यीतील सुमना- रिमखीम भागातील एका ठिकाणी हिमकडा कोसळ्याची दुर्घटना घडली.
या भागातच सीमा सडक संघटनेची (बीआरओ) डिटॅचमेंट आहे त्याशिवाय मजूरांचे दोन कँपसुद्धा रस्ता बांधणीसाठी तैनात केलेले आहेत. सुमना गावापासून सैन्याचा कँपसुद्धा तीन किलोमीटर दूर आहे.
सैन्याने दिलेल्या माहितीनुसार गेले ५ दिवस या भागात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे, जी अजूनही चालू आहे. अनेक ठिकाणी घडलेल्या भूस्खलनाच्या विविध घटनांमुळे रस्ता विविध ठिकाणी तुटून गेला आहे. जोशीमठ येथील बीआरटीएफच्या समूहाने हा रस्ता जागोजागी दुरूस्त करण्याचे काम सुरू केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) दिलेल्या माहितीनुसार ऋषिगंगा नदीच्या पाणीपातळीत देखील दोन फुटांची वाढ नोंदली गेली आहे. केंद्र सरकारकडून या विभागातील सर्व आपत्ती व्यवस्थापनातील घटकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.