मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून काल सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, विरोधकांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. यावरून विरोधकांवर जोरदार टीका करण्यात आली. मंत्री विखे पाटील यांनी देखील आज विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. मविआच्या नेत्यांनी कधीही मराठा आरक्षणावर भाष्य केलं नाही, फडणवीस सरकारने मराठा समजाला आरक्षण दिल. मविआचे नेत्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे मराठा समाज त्यांना माफ करणार नाही, असे मंत्री विखे पाटील म्हणाले आहेत.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणावरून विरोधकांच मोठं षडयंत्र आहे. चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याने आतापर्यंत मराठा आरक्षणावरून कधीही ब्र शब्द काढला नाही, मराठा समाजाच्या मोर्च्यात देखील सहभागी झाल्याचे दिसले नाहीत, मराठ्यांबद्दल सकारात्मक भूमिका कधी घेतली नाही. मागच्या सरकारने दिलेलं आरक्षण टिकलं नाही. मात्र, फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण दिल, त्याचे कायद्यात रूपांतरकरून सुप्रीम कोर्टात सादर केलं आणि ते टिकलं. ठाकरेंचे फेसबुकवर चालणार सरकार होत. विरोधक मतांचं राजकारण करत आहेत आणि मराठा आरक्षणाचे विरोधक कोण आहेत हे मनोज जरांगे यांनी स्वतः पहावे आणि अशा लोकांची गावबंदी करावी, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.
हे ही वाचा:
“गाडी मीच चालवत होतो” वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शाहची कबुली
‘विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी उत्तम अधिवक्त्यांची नेमणूक करावी’
केजरीवाल यांनी अतिरिक्त १०० कोटी मागितले !
विशाळगडावरील मलिके रेहान दर्गा हटवा, नाहीतर…
ते पुढे म्हणाले की, आरक्षण मिळावे यासाठी आम्ही तयार आहोत त्यानुसार सरकार देखील पाऊल टाकत आहे. मात्र, विरोधकांनी कालच्या बैठकीवर घातलेला बहिष्कारावरून यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा विश्वासघात करणाऱ्या मविआच्या नेत्यांना मराठा समजा आणि ओबीसी समाज माफ करणार नसल्याचे मंत्री म्हणाले.