सीबीआयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यावर भाजपाचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. या प्रकरणाचा सूत्रधार मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आहे का सिल्वर ओकमध्ये? असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला आहे.
खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे कोण हे आता उघड होईलच… pic.twitter.com/d5sYLZLGfz
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 24, 2021
“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयकडून दाखल करण्यात आलेली एफआयआर ही एक ऐतिहासिक घटना असून, योग्य दिशेने तपास यंत्रणा काम करत असल्याचे चिन्ह आहे. आता सीबीआयने या गोष्टीचा तपास करणे गरजेचे आहे की, या बदल्यांच्या घोटाळ्यामागे खरा सचिन वाझे कोण आहे? तो मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसायचा का सिल्वर ओकवर? हे सीबीआयला शोधून काढावे लागेल.” अशी घणाघाती टीका भातखळकरांनी केली आहे.
खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर??? pic.twitter.com/7TQwo2nxN2
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 24, 2021
सीबीआयने आज सकाळीच अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करून त्यानुसार कारवाईला सुरूवात केली आहे. अनिल देशमुख यांच्या सोबतच त्यांच्या पीएंच्या घरावर देखील छापे मारले जाणार आहेत. परमबीर सिंह यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप त्यांच्यावर केले होते. त्या प्रकरणातील तपासाला सुरूवात झाली आहे.
हे ही वाचा:
बंगळुरूमध्ये पुण्यापेक्षा जास्त ऍक्टिव्ह केसेस
पॅरिसमध्ये इस्लामी दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला
विरार दुर्घटनेत हॉस्पिटल प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल
अनिल देशमुखांचे घर, कार्यालयासह, दहा ठिकाणी सीबीआयचे छापे
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणात अनेक पोलिस अधिकाऱ्यांची नावे समोर आली होती. त्याबरोबरच हे प्रकरण थेट गृहमंत्र्यांशी सुद्धा जोडले गेले आहे. सचिन वाझे सह त्याचे काही साथीदार, त्याशिवाय पोलिस दलातील इतर काही अधिकारी देखील या प्रकरणात अटकेत गेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.