फ्रान्समध्ये नुसत्याच झालेल्या मतदानात उजव्या विचारसरणीचा नॅशनल रॅली हा पक्ष सर्वाधिक मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेला. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात झालेले टॅक्टीकल मतदानामुळे सत्तेवर येण्याची शक्यता असलेला हा पक्ष मागे पडला. आता फ्रान्समध्ये डाव्यांचे संकरीत खिचडी सरकार येण्याची शक्यता आहे. ‘लाट उसळली. ती अपेक्षे इतकी उंच नसली, तरी ती उंचावते आहे. आमचा विजय फक्त काही काळ लांबला आहे’, असे उद्गार नॅशनल रॅलीच्या प्रमुख मरीन ल पेन यांनी काढले आहेत. भारतीयांना या निवडणुकीत शिकण्यासारखे बरचे काही आहे.