पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय ऑस्ट्रिया (९- १० जुलै) दौऱ्यावर जात आहेत.पंतप्रधान मोदींचा हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण ४१ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रिया दौऱ्यावर जात आहेत. याआधीची शेवटची भेट १९८३ मध्ये होती, जेव्हा इंदिरा गांधी भारतीय पंतप्रधान म्हणून ऑस्ट्रियाला पोहोचल्या होत्या. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रिया दौऱ्यावर जात आहेत.
१९५५ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरू ऑस्ट्रियाला भेट दिली होती. त्यावेळी ऑस्ट्रियाला भेट देणारे नेहरू हे पहिले पंतप्रधान ठरले होते. यानंतर इंदिरा गांधी पंतप्रधान असताना १९७१ आणि १९८३ मध्ये ऑस्ट्रियाला गेल्या होत्या. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी हे तिसरे पंतप्रधान बनणार आहेत, जे ऑस्ट्रियाला भेट देणार आहेत.
हे ही वाचा:
पुण्यात हिट अँड रनची आणखी एक घटना, गस्तीवर असलेल्या हवालदाराला कारने चिरडले!
मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये
पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद
इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !
पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा भारत आणि ऑस्ट्रिया त्यांच्या राजनैतिक संबंधांचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी ऑस्ट्रियामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाच्या लोकांनाही भेटणार आहेत.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, जर आपण ऑस्ट्रियाला पोहोचलेल्या पहिल्या पंतप्रधानांबद्दल बोललो तर, १९४९ मध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर, जवाहरलाल नेहरू १९५५ मध्ये पंतप्रधान म्हणून ऑस्ट्रियाला गेले होते. भारत आणि ऑस्ट्रियामध्ये नेते, मंत्री आणि संसद सदस्यांच्या पातळीवर वारंवार भेटी होत आहेत, मात्र भारताकडून पंतप्रधानांची ही तिसरी भेट आहे.