28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
घरविशेषमुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे कंट्रोल रूममध्ये

मुंबईकरांना सहकार्य करण्याचे आवाहन

Google News Follow

Related

मुंबईसह उपनगरांना रविवार रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. अशातच मुंबईतील वाहतूक व्यवस्थेची दैना उडालेली दिसत आहे. मुंबईची लाइफ लाईन असलेली उपनगरीय रेल्वे वाहतूक मंदावली असून रस्ते मार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरू आहे. या स्थिती संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टीव्ही ९’शी बोलताना माहिती दिली आहे.

“रेल्वेच्या डीआरएमशी चर्चा केली असून महापालिका आयुक्त, डिझास्टर मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांशीही संपर्कात आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. चुनाभट्टी, मानखुर्द या ठिकाणी पाणी साचलय. हार्बर, फास्ट लाइन आता सुरु होतेय. पंपाने पाणी काढायच काम सुरु आहे. सांताक्रूझ येथे २६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. पंपाने पाणी काढायच काम सुरु आहे. लवकरच पाणी कमी होईल. वाहतूक सुरळीत होईल. प्रवाशांची गैरसोय दूर होईल. अशा प्रकारे यंत्रणा काम करतेय,” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये पोहचले आहेत. मुंबईतील परिस्थितीचा मुख्यमंत्री शिंदे स्वतः आढावा घेत आहेत. तसेच अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. त्यांनी मुंबईकरांना सहकार्य करण्याचे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी रशिया, ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी रवाना; रशियातील भारतीयांशी साधणार संवाद

इस्रायलचा गाझातील शाळेवर हवाई हल्ला, १६ जणांचा मृत्यू !

पावसाने मुंबईला झोडपलं; रेल्वेसेवा खोळंबली, रस्ते वाहतूक धीम्या गतीने

‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’

“रेल्वेने आमदार, मंत्री आलेत. त्यांना या वाहतूक कोंडीचा फटका बसलाय. यंत्रणा फास्ट काम करतायत. पाऊस जास्त पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अशी स्थिती झाली. प्रवाशांना विनंती आहे की, थोडं सहकार्य करा, लवकरच गैरसोय दूर होईल,” असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. “सिंधुदुर्ग, रायगडमध्ये रेड अलर्ट असून सर्व यंत्रणा काम करत आहेत. यातून मार्ग निघेल,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवाय पाणी भरतंय त्या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या पोहोचल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
178,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा