26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेष'हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले'

‘हाथरसच्या गर्दीत विषारी वायूचे कॅन उघडल्याने लोक गुदमरले’

साकार हरीच्या वकिलाचा नवा दावा

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात एका सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरी बाबत साकार हरीच्या वकिलाने नवा दावा केला आहे. १५ ते १६ लोकांजवळ विषारी वायूने भरलेले कॅन होते, जे त्यांनी गर्दीच्या ठिकाणी उघडले आणि त्यामुळे लोकांचा गुदमरून मुत्यू झाल्याचा दावा वकिलाने केला आहे. डब्यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे लोकांचे मृत्यू झाल्याचे हरीचे वकील एपी सिंह यांनी म्हटले आहे.

नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचे वकील एपी सिंह यांनी रविवारी (७ जुलै) सांगितले की, हाथरसमधील सत्संगानंतरची झालेली दुर्घटना म्हणजे बाबांच्या वाढत्या लोकप्रियतेविरुद्धचे षड्यंत्र आहे. अपघाताच्या साक्षीदारांनी माझ्याशी संपर्क साधला. साक्षीदारांचे म्हणणे आहे की १५-१६ लोक विषारी वायूचे कॅन घेऊन जात होते आणि त्यांनी ते कॅन गर्दीच्या ठिकाणी उघडले. त्यामुळे तेथे चेंगराचेंगरी झाली.

हे ही वाचा:

महुआ मोईत्रांना वक्तव्य भोवणार, एफआयआर दाखल!

‘मलाही विश्वचषक विजेत्यांसारखा सन्मान हवा!..’

आशिया चषकासाठी महिला टीम इंडियाची घोषणा; हरमनप्रीत कौरची कर्णधारपदी निवड

‘राजकीय दबावाला बळी पडू नका, योग्य कारवाई करा’

ते पुढे म्हणाले की, मी मृतांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिला आहे आणि त्यात असे दिसून आले आहे की त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे, इतर कोणत्याही कारणामुळे झाला नाही. चेंगराचेंगरीमागे कट असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, ज्यांनी विषारी वायू सोडला त्यांना मदत करण्यासाठी घटनास्थळी वाहने उभी होती. आमच्याकडे पुरावे आहेत आणि आम्ही ते देणार आहोत. आमच्याकडे आलेल्या साक्षीदारांनी नाव न सांगण्याची विनंती केली असून आम्ही त्यांच्या सुरक्षेची मागणी करणार आहोत, असे वकिलांनी सांगितले.

दरम्यान, हाथरस येथे सूरजपाल उर्फ ​​नारायण साकार हरी उर्फ ​​भोले बाबा यांच्या सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोक मरण पावले होते. या प्रकरणी मुख्य आरोपी देवप्रकाश मधुकरसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा