27 C
Mumbai
Sunday, October 6, 2024
घरविशेषफॉर फ्युचर इंडिया संस्थेचे ३०० वे स्वच्छता अभियान

फॉर फ्युचर इंडिया संस्थेचे ३०० वे स्वच्छता अभियान

१ टनाहून अधिक कचरा गेला गोळा

Google News Follow

Related

७ जुलै २०२४ रोजी फॉर फ्युचर इंडिया संस्थेचा ३०० वा स्वच्छता मोहिमेचा उपक्रम यशस्वीपणे मिरा भाईंदर उत्तन येथील वेलंकनी समुद्रकिनारी पार पडला. या स्वच्छता मोहिमेत १५० हुन अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेत १ टनाहून अधिक प्लस्टिक व इतर कचरा काढला. यावेळी पाटकर वर्दे कॉलेज, अथर्व कॉलेज, सायली कॉलेज, लाडीदेवी कॉलेज, जे एम पटेल कॉलेज या कॉलेज च्या एन एन एस स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. मिरा भाईंदर महानगपालिकेचे कर्मचारी सुद्धा होते परंतु गेली अनेक महिन्यापासून समुद्रकिनारी स्वच्छता करीत आणलेल्या मशिनरी ( यंत्र ) गंज खात पडून आहे याचा वापर केला जात नाही हे दिसून आले.

“फॉर फ्युचर इंडिया” ही संस्था गेल्या साडेचार वर्षांपासून प्रत्येक आठवड्याला शनिवारी व रविवारी कोणत्या न कोणत्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान करण्याचे म्हणजेच आपल्या निसर्ग सौंदर्यात भर घालण्याची मोहीम अतिशय उत्साहाने राबवत आहे. आता पर्यंत आम्ही गेल्या चार वर्षात ३०० स्वच्छता उपक्रमात १ लाखहुन अधिक स्वयंसेवकासोबत उत्तन, वेलंकनी, मनोरी, गोराई समुद्रकिनाऱ्यावर २५०० टनहून अधिक प्लॅस्टिक व इतर कचरा काढण्याची मोहीम यशस्वी रित्या राबवली आहे. समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसोबतच मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर शहरातील अनेक कांदळवन क्षेत्रात स्वच्छता व संवर्धनाचे कार्य, वृक्षारोपण, जल संवर्धन सोबत अनके पर्यावरण विषयांवर प्रबोधन करण्याचे कार्य यशस्वीपणे राबवत आहे.

फॉर फ्युचर इंडिया ने स्वच्छता मोहिमेत तीन विक्रम करत आपले नाव इंटर्ननशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले आहे. तसेच इंडियन स्वच्छता लीग २.० अवॉर्ड, स्वच्छता चॅम्पियन सन्मान, WINS अवॉर्ड्स, पालिकेमार्फत वन महोत्सव पुरस्कार, कांदळवन संवर्धनसाठी कांदळवन-वन विभागाचा पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने फॉर फ्युचर इंडिया संस्था सन्मानित झाली आहे.

हे ही वाचा:

विशाळगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू !

दिल्लीत कोचिंग क्लासमध्ये कुराण, कलमाचे ‘शिक्षण’ देत असल्याची तक्रार

एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारता पाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव

१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

दिनांक १ जुलै २०२४ रोजी यशोभूमी, IICC, द्वारका, नवी दिल्ली येथे IESA व Earth Day मार्फत पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणाऱ्यांसाठी अंतरराष्ट्रीय स्तरावर भव्य पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. ‘जनसमुदाय एकत्र करून पर्यावरनाचे संवर्धन व संरक्षण’ श्रेणीत ११ हुन अधिक देशातून शेकडो नामांकन मधून ‘फॉर फ्युचर इंडिया’ पर्यावरणवादी युवा संस्थेला IESA EARTH DAY ग्रेट ग्लोबल क्लीनअप हिरोज अवॉर्ड्स 2024 चे विजते म्हणून सन्मानित करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा