बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी तामिळनाडूतील त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. आर्मस्ट्राँग यांच्या झालेल्या हत्येचा निषेध करतानाच तामिळनाडूत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती नाजूक असल्याची टीकाही केली.
रविवारी मायावती त्यांचे भाचे व बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यासह चेन्नईत दाखल झाले. तिथे त्यांनी आर्मस्ट्राँग यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि तामिळनाडूतील कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
मायावती पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, आर्मस्ट्राँग यांची ज्या पद्धतीने हत्या झाली ती पाहता तिथे कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. अजूनही मुख्य आरोपींनी अटक करण्यात आलेली नाही.
मायावती यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली राज्यात असलेल्या डीएमकेचे सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबत अजिबात गंभीर नाही. जर योग्य चौकशी आणि तपास केला असता तर आरोपी गजाआड झाले असते. जर राज्य सरकारला या प्रकरणाचा तपास करायचा नसेल तर हे प्रकरण सीबीआयच्या हाती द्यायला हवे.
हे ही वाचा:
मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना, महिलेचा मृत्यू!
जम्मू कश्मीर में सेना ने मार गिराए चार आतंकवादी; भारतीय सेना के दो जवान शहीद!
राज्यात नव्याने १० हजार गावांमध्ये हवामान केंद्राची उभारणी करणार
महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य!
आम्ही या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करत आहोत. जर राज्य सरकार सीबीआयकडे हे प्रकरण सोपवत नाही तर याचा अर्थ तेही या खुनात सहभागी आहेत. आर्मस्ट्राँग यांच्या हत्येसंदर्भात बोलताना मायावती म्हणाल्या की, तामिळनाडूत दलितांचे जीवन सुरक्षित नाही. ही केवळ एक घटना नाही तर तामिळनाडूत संपूर्ण दलित समाज दहशतीच्या वातावरणात आहे. अनेक दलित नेते हे जीवाच्या भीतीने घाबरलेले आहेत.
मायावती यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही आवाहन केले की, त्यांनी कायदा हातात घेऊ नये.
के. आर्मस्ट्राँग (५२) हे पेरंबूर येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर असताना त्यांच्यावर अज्ञात लोकांनी हल्ला केला. फूड डिलिव्हरी बॉयचा वेष करून हे हल्लेखोर आले होते. सीसीटीव्हीत ते दिसत आहे.