गोहत्याबंदीसाठी रत्नागिरीमध्ये सकल हिंदू समाजाकडून आज (७ जुलै) मोर्चा काढण्यात आला आहे. भाजप नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. गोहत्या करणाऱ्या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करून त्यांचे कत्तलखाने उध्वस्त करावे अशी मागणी निलेश राणे यांनी यावेळी केली.
भाजप नेते निलेश राणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू समाज उपस्थित होता. पुरुष, महिला आणि तरुणांनी हातात गोहत्या विरोधी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी निलेश राणे आक्रमक झालेले पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल हिंदू समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आला. विविध हिंदू संघटना या आंदोलनामध्ये सहभागी होत्या. गोहत्या बंदीसाठी भर पावसात हे आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी मध्ये सुरु असलेली गोहत्या लवकरात लवकर थांबवून कत्तलखाने लवकरात बंद करण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने पोलिसांना करण्यात आली.
हे ही वाचा:
छत्तीसगडच्या सुकमा येथे ५ नक्षलवाद्यांना अटक !
मुंबईतील वरळीत हिट अँड रनची घटना, महिलेचा मृत्यू!
जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत २ जवान हुतात्मा तर ५ दहशतवादी ठार!
एक गठ्ठा मुस्लीम मतांचा भारता पाठोपाठ ब्रिटनमध्येही पराभव
यावेळी निलेश राणे आक्रमक होत कोकणनगरात हा सर्व प्रकार बलवले नामक व्यक्तीकडून घडत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी त्याला अनेकदा अटक झाली परंतु काही कारवाई करण्यात न आल्याचे त्यांनी सांगितले. त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून कत्तलखाने बंद करावे अशी मागणी यावेळी निलेश राणे यांनी केली.