24 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेष‘राहुल गांधी, जयराम रमेश चीनचे एजंट’

‘राहुल गांधी, जयराम रमेश चीनचे एजंट’

राज्यसभेचे खासदार महेश जेठमलानी यांचा घणाघात

Google News Follow

Related

भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदानी यांचे जबर आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने जाहीर केलेल्या अहवालाची चौकशी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) करण्याचे ठरविल्यानंतर याला आता आणखी एक नवे आणि तेवढेच खळबळजनक वळण मिळाले आहे. या संपूर्ण प्रकरणात चिनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असलेल्या एका चिनी महिलेचा संबंध असून त्यांचे नाव ऍनला चेंग असे आहे. या महिलेनेच हा कट शिजवला असल्याचे समोर येत असून त्या कटाला हवा देण्याचे आणि तशी वातावरणनिर्मिती करण्याचे काम काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि त्यांचे मार्गदर्शक जयराम रमेश करत होते. ते या प्रकरणातील चिनी हस्तक आहेत, असा घणाघाती आरोप भाजपाचे राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी केला आहे.

जयराम रमेश यांनी जानेवारी महिन्यात या हिंडेनबर्ग प्रकरणावर भाष्य करताना हे सगळे हितसंबंधी भांडवलशाहीचे प्रकरण असल्याचे म्हटले होते. तेच ट्विट शेअर करत जेठमलानी यांनी म्हटले आहे की, जयराम रमेश हे खोटारडे आहेत. काँग्रेसने जो अदानी उद्योगसमुहावर हल्ला केला होता तो हितसंबंधी भांडवलशाहीवरून केला नव्हता तर अदानींना गुणवत्तेच्या जोरावर जी कंत्राटे मिळत होती, त्यामुळे चीनच्या प्रयत्नांना खीळ बसत असल्यामुळे केला होता. श्रीलंकेतील जाफना येथील कोळशाच्या प्रकल्पाचे कंत्राट अदानी समुहाला मिळाले होते. शिवाय, ऑस्ट्रेलियातील गॅलिली बेसीन येथील अदानींच्या कोळशाच्या खाणप्रकल्पांमुळे चीनच्या चायना स्टोन प्रकल्पालाही धक्का बसत होता. त्यातून इस्रायलमधील हैफा येथील बंदर विकत घेण्याच्या चीनच्या प्रयत्नांनाही लगाम घातला जात होता. यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि त्यांचे मार्गदर्शक जयराम रमेश हे चीनचे एजंट असून ते चीनच्या धोरणात्मक हितसंबंधांचे पुरस्कर्ते आहेत आणि भारताच्या उद्योगपतींच्या हितांना बाधा पोहोचवत आहेत.

 

सेबीने जेव्हा हिंडेनबर्गला ही चौकशीची नोटीस पाठवली तेव्हा त्यात हेज फंड आणि कोटक ही भारतीय बँक यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्या नोटिशीतून स्पष्ट होते आहे की, हिंडेनबर्गने अदानी उद्योगसमुहाबद्दल जो अहवाल तयार केला तो किंग्डन कॅपिटल मॅनेजमेंट एलएलसी या न्यूयॉर्कस्थित कंपनीला पाठविला. त्यानंतरच तो जाहीर करण्यात आला. या हिंडेनबर्ग आणि किंग्डन यांच्यात नफ्याच्या वाटणीचा करार झालेला आहे. किंग्डनने कोटक महिंद्रा बँकेचा वापर व्यवहारासाठी केलेला आहे.

हे ही वाचा:

जाग हिन्दू बांधवा प्राण संकटी तरी …

जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच

हिंदुत्ववादी शिवानी राजा ब्रिटनच्या निवडणुकीत जिंकल्या!

तोंडावर आपटलेल्या काँग्रेसचे पुन्हा लष्करावर प्रश्नचिन्ह!

ऍनला चेंग कोण आहेत?

 

पण एवढेच नाही तर सेबीने जेव्हा ही चौकशीची नोटीस बजावली तेव्हा किंग्डन कॅपिटलचे मालक मार्क इलियट किंग्डन यांच्याकडे लक्ष वेधले गेले आहेच पण त्यांची पत्नी ऍनला चेंग याही संशयाच्या भोवऱ्यात आल्या आहेत.

किंग्डन यांच्या पत्नीचे चीनी कम्युनिस्ट पक्षाशी संबंध असल्याचे सोशल मीडियावर समोर येते आहे. त्यामुळे हिंडेनबर्गच्या या साऱ्या प्रकरणात चिनी हात असण्याची शक्यता बळावली आहे.

भाजपाचे राज्यसभेतील खासदार आणि ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी चेंग या चिनी हेर असल्याचा आरोप केला आहे.

चेंग या चिनमध्ये जन्मल्या असून त्यांचे संगोपन जपानमध्ये झालेले आहे. पण चीनमध्ये गेली २० वर्षे त्या गुंतवणूक करत आहेत. त्यांनी २०१६मध्ये सुपचायना नावाची कंपनी स्थापन करून चीनमध्ये उद्योग सुरू केला. डिजिटल बातम्या आणि इव्हेन्ट मॅनेजमेंट असा हा उद्योग आहे. नंतर त्याचे २०२२मध्ये चायना प्रोजेक्ट म्हणून नाव बदलण्यात आले. पण हाच चायना प्रोजेक्ट चीनचा एजंट असल्याचा आरोप केला जाऊ लागला. त्यांच्याच प्रोजेक्टमधील एका पत्रकाराने हा आरोप केला की, हा प्रोजेक्ट चिनी सरकार पुरस्कृत आहे.

दरम्यान, महेश जेठमलानी यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट शेअर करत काँग्रेसलाही लक्ष्य केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा