स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स असोसिएशन ऑफ मुंबई (एसजेएएम) च्या वतीने विविध खेळातील ज्येष्ठ खेळाडूंना जीवनगौरव पुरस्कार देऊन मंगळवारी गौरविण्यात आले. बॉम्बे जिमखाना येथे हा सोहळा पार पडला. त्यात भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मुंबईचे माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू व प्रशिक्षक रघुनंदन गोखले, मुष्टियुद्धातील आंतरराष्ट्रीय रेफ्री जज किशन नरसी, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे सचिव सौटर वाझ, शिवछत्रपती पुरस्कार विजेते कॅरमपटू अरुण केदार, अर्जुन पुरस्कार विजेत्या माजी कबड्डीपटू माया आक्रे मेहेर या नामवंत खेळाडूंचा समावेश होता. बॉम्बे जिमखानाचे अध्यक्ष संजीव शरण मेहराही यावेळी उपस्थित होते.
मानपत्र, या खेळाडूंचे ऑस्टिन कुटिन्हो यांनी काढलेली विशेष रेखाचित्रे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
हे ही वाचा:
हिंदूद्वेष्ट्या राहुल गांधीना देवाच्या बापाने दिले वारीचे निमंत्रण?
दोन बायका असणाऱ्याना लाडकी बहिण योजनेचा लाभ नको
“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”
इटलीतील भारतीय वंशाच्या कामगाराच्या मृत्युप्रकरणी एकास अटक
यावेळी पॅरिस ऑलिम्पिकच्या निमित्ताने प्रसिद्ध खेळाडूंशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली. सूत्रसंचालक प्रसन्न संत यांनी या खेळाडूंना बोलते केले. त्यात माजी बॅडमिंटनपटू लेरॉय डिसा, भारताचे माजी टेनिसपटू पुरव राजा, रायफल नेमबाज आणि प्रशिक्षक सुमा शिरूर, भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला आणि माजी हॉकी कर्णधार विरेन रस्किन्हा यांचा समावेश होता. त्यांनी ऑलिम्पिकमधील भारताच्या आशाअपेक्षांबद्दल आपली स्पष्ट मते व्यक्त केली. शिवाय, आतापर्यंतच्या ऑलिम्पिकच्या तुलनेत यंदा आपण आणखी दमदार कामगिरी करू असा विश्वासही सगळ्या तज्ज्ञ खेळाडूंनी व्यक्त केला.