राष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीचे महत्व सांगितले. त्यांना वारीसाठी निमंत्रण दिले. राहुल गांधी यांनी वारीचे निमंत्रण स्वीकारले असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही नेते हिंदू विरोधी राजकारणासाठी, हिंदू देवदेवतांच्या टवाळीसाठी ओळखले जातात. शरद पवार स्वत:ला देवाचा बाप म्हणवतात, राहुल गांधी हिंदू धर्मातील शक्तीला संपवण्याची भाषा करतात. शरद पवार हे वारकरी नाहीत, ते स्वत: वारी करत नाही, त्यांना अहिंदू असलेल्या राहुल गांधी यांना वारीत बोलवण्याचा अधिकार कोणी दिला?
राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार संजय जगताप सांगतात की, शरद पवारांनी राहुल गांधी यांना वारी म्हणजे काय ते समजावून सांगितले. त्यानंतर राहुल गांधी वारीत येण्यासाठी तयार झाले. मुळात पवारांना वारी समजली आहे का? समजली असती तर एखाद्या वर्षी तरी ते वारीत चालले असते, धन्य झाले असते. आध्यात्माचा पवारांशी काय संबंध? वारीत राजकारणाच जोडे बाहेर ठेवा असा शहाणपणाचा सल्ला जगताप देतायत. परंतु धर्मश्रद्धेचे काय कराल? ती बाजूला ठेवता येईल का? ती नसेल तरी वारीत चालता येईल का? राहुल गांधी म्हणे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांचे दर्शन घेणार आहेत.
ज्ञानेश्वरांनी भगवद गीतेचे प्राकृतात रुपांतर केले. ज्ञानेश्वरी नावाच्या महाग्रंथाची रचना केली. काँग्रेसचा एक नेता के.सी.वेणूगोपाल संसदेत म्हणाला आहे की, नथुराम गोडसेने भगवद गीतेतून हिंसा आणि द्वेषाची प्रेरणा घेतली. ही काँग्रेसची लायकी आहे. काँग्रेसचे नेतृत्व एक अहिंदू परिवार करतोय, हा परिवार फक्त अहिंदू नाही तर हिंदू द्वेष्टा आहे. या लोकांची अभद्र पाऊले वारीत पडणार नाही, यासाठी हिंदू समाज एकवटाला हवा.
काटेवाडी हे पवारांचे गाव. वारीचा मार्ग या गावातून जातो. शरद पवार त्यांच्या ८३ वर्षांच्या आय़ुष्यात कधी वारीत चालले नाहीत. कधी त्यांनी या वाटेने जाणाऱ्या वारकऱ्यांवर फुलं उधळली नाहीत, कधी वारीचे स्वागत केले नाही. त्यामुळे पवारांचा आणि वारीचा संबंध काय ? मविआच्या कार्यकाळात वारीवर बंदी घालण्यात आली होती. परंतु दारुची दुकाने मात्र खुली करण्यात आली होती. त्यामुळे पवारांचा वारीशी संबंध काय? वारीसाठी निमंत्रण देणारे ते कोण ? असा सवाल निर्माण होतोच. वारी विठ्ठला वर जीव ओवाळणाऱ्या वारकऱ्यांसाठी आहे, हिंदू धर्म विरोध्यांसाठी नाही. पवारांचे निमंत्रण म्हणजे विश्व हिंदू परीषदेच्या एखाद्या पदाधिकाऱ्याने राजा सिंह यांच्यासारख्या कडवट हिंदुत्ववादी नेत्याला एखाद्या मशीदीत हनुमान चालीसा म्हणायला या असे आमंत्रण देण्यासारखे आहे.
राहुल गांधी यांना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या धर्माबद्दल सुद्धा मोठे गुढ आहे. ते कोणत्या धर्माचे आहेत, हे एकदा स्पष्ट करावे. त्यांचे आजोबा फिरोज गांधी हे पारशी गृहस्थ होते. इंदीरा गांधी यांच्याशी विवाही झाल्यानंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारल्याचे कुठे वाचनात आलेले नाही. असा कोणताही पुरावा नाही, त्यामुळे त्यांचा नातू आणि एका इटालियन ख्रिस्ती आईचा मुलगा हिंदू धर्मीय कसा असेल? बरं राहुल गांधी यांनी कधी शुद्धीकरण केले, हिंदू धर्म स्वीकारला अशी बातमीही कधी वाचनात आलेली नाही. ते स्वत:ला ज्या दत्तात्रय गोत्राचे म्हणतात, ते गोत्रच अस्तित्वात नाही. याचा अर्थ हिंदू असल्याचा मुखवटा चढवून हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र कऱणारा हा माणूस आहे. हा हिंदू असता तर हिंदू धर्मात शक्तीचे महत्व काय हे याला माहीत असते. या माणसाला हिंदू धर्मातील शक्तीचा मुकाबला करायचा आहे, ही शक्ती संपवायची आहे.
हिंदूंना जाती, भाषा आणि प्रांतात विभाजीत करणे हा गांधी परीवाराच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा अजेंडा आहे. हा पक्ष मुस्लीम मतांवर पोसलेला आहे. या पक्षाची नीती फाळणीपूर्वीच्या मुस्लीम लीगशी तंतोतंत जुळणारी आहे. संसदेत बोलताना याने हिंदू धर्माविषयी गरळ ओकली. हिंदू हिंसा फैलाता है, हिंदू म्हणजे नफरत, हिंदू म्हणजे असत्य ही सगळी वाक्य त्यांचीच. जो माणूस हिंदू नाही, ज्याचा हिंदूत्वावर विश्वास नाही, जो हिंदूंच्या श्रद्धास्थानांची टवाळी करतो. अशा माणसाला वारीत बोलावून शरद पवारांना कोणते राजकारण साधायचे आहे?
वारी म्हणजे इफ्तार पार्टी थोडीच आहे? विठ्ठलावर श्रद्धा असलेले लोक हजारोंच्या संख्येने दरसाल वारीत चालतात. पंढरीत जाऊन विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. शेकडो वर्षे वारी नावाची ही भक्ती गंगा अविरत वाहते आहे. शरद पवारांना त्यातल्या भक्तीचे, श्रद्धेचे, अध्यात्माचे, हिंदू परंपरेचे वावडे आहे. नसते तर आम्ही देवाचे बाप आहोत, असे उद्गार त्यांच्या तोंडून कधी निघाले नसते.
हे ही वाचा:
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबईच्या त्रैवार्षिक निवडणुकीत रत्नसिंधू पॅनलची बाजी
चीनमध्ये खासगी रॉकेटचा भीषण अपघात
भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत
पुण्यात झिका रुग्णांची संख्या सातवर
त्या वारीपासून स्वत: देवाचे बाप असलेल्या शरद पवारांनी लांब राहीले पाहीजे, ते राहुलना कुठे निमंत्रण देतायत? वारकरी म्हणजे मांसाहार करत नाहीत, दारुच्या थेंबाला स्पर्श करत नाही. त्या वारीपासून संकष्टीला मटण ओरपणाऱ्या अंबिका मटणवाल्यांनी दूर राहावे, राहुल गांधी तर पाय सुद्धा ठेवू नये. पवार कुटुंबियांनी दूर रा हिंदू धर्माची मलेरीया, प्लेग आणि डेंग्यूशी तुलना करणारी देशात जी गँग आहे, त्या गँगमधली शरद पवार हे महत्वाचे नेते आहेत. राहुल गांधी सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी हिंदूंना जाती जातीत विभागण्याचा त्यांचा अजेंडा जोरात राबवावा, वारकऱ्यांची भक्ती गंगा दूषित करण्याचे काम करू नये.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)