रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई त्रैवार्षिक निवडणूकित रत्नसिंधू मराठा पॅनलने बाजी मारली आहे. रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाजाच्या मुंबई त्रैवार्षिक निवडणूकित रत्नसिंधू मराठा पॅनलची सत्ता आली आहे. रत्नसिंधू मराठा पॅनल मधून उमेदवार सहदेव शिवराम सावंत यांची कार्याध्यक्ष पदी निवड झाली. तर, अशोक लक्ष्मण परब आणि गणपत होणाजी तावडे यांची उपकार्यध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.
कार्यकारिणी सदस्य पदी सुबोध यशवंत बने, सुहास तुकाराम बने, विनोद दिनकर बने, सुशिल जयवंत चव्हाण, सुरक्षा शशांक घोसाळकर, विजय गोविंद जाधव, उमाकांत पंढरीनाथ कदम, विजय गोविंद खामकर, दीपक शंकर खानविलकर, सचिन दत्ताराम खानविलकर, जितेंद्र दत्ताराम पवार, इंद्रायणी गणेश सावंत, यशवंत गोपाळ साटम यांची निवड झाली आहे.
हे ही वाचा:
भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ बंद
वारकऱ्यांना महायुती सरकारकडून भेट; पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी
“संविधानाची प्रत घेऊन उड्या मारणाऱ्यांचा संविधान दिनाला होता विरोध”
भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज मुंबई या संस्थेची स्थापना ८ ऑक्टोबर १९६२ साली झाली. संस्थापक कै. वि.ना.उर्फ भाऊ शिंदे यांनी तत्कालिन समाज धुरीण के प्रभाकर विश्वासराव, भास्कर कदम, भास्कर धाग, मनोहर शेलार, एकनाथ साळुंखे, रघुनाथ चव्हाण, दशरथ पालकर यांना घेऊन संस्थेचे कार्य चालू केले. शिक्षण हाच समाज उन्नतीचा मार्ग आहे हे जाणून संस्थेने २ ऑक्टोबर १९६७ रोजी बालविकास विद्यामंदिर या शाळेची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत गेली ५७ वर्षे बालविकास विद्यामंदिरची यशस्वी वाटमाल सुरु आहे. २००४ साली काळाची गरज म्हणून संस्थेने आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली.