नुकताच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगला होता. या स्पर्धेत फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील अंतिम सामना बार्बाडोस येथे खेळला गेला. या सामन्यात विजय मिळाल्यानंतर भारतीय संघ कधी एकदा ट्रॉफी घेऊन मायदेशी परततो आहे याची उत्सुकता भारतीय चाहत्यांना लागली आहे. मात्र, चाहत्यांच्या या उत्सुकतेवर पाणी फेरले असून अजून काही काळ वाट पहावी लागणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा अंतिम सामना जेथे रंगला त्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळ आले आहे. ‘बेरील’ चक्रीवादळामुळे भारतीय संघाचे परतीचे वेळापत्रक कोलमडले आहे. सोमवारीच भारतीय संघ बार्बाडोसमधून न्यूयॉर्कला पोहचणार होती. परंतु, खराब वातावरणामुळे त्याचे विमान रद्द करावे लगाले. सध्या विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भारतीय खेळाडू हॉटेलमध्येच अडकले आहेत. खेळाडूंना आणण्यासाठी भारतीय क्रिकेक नियामक मंडळ (बीसीसीआय) विशेष विमान पाठवणार असल्याची माहिती आहे.
पूर्वनिश्चित वेळापत्रकानुसार भारतीय संघाचे खेळाडू आज न्यूयॉर्कला रवाना होणार होते. न्यूयॉर्कमधील भारतीय खेळाडूंना कनेक्टेड फ्लाइटने दुबईला जावे लागते, परंतु आता चक्रीवादळ बेरीलमुळे ते जवळजवळ अशक्य मानले जात आहे. दरम्यान, बार्बाडोसचे पंतप्रधान मिया मोटली यांनी रविवारी रात्री विमानतळ बंद राहणार असल्याचे जाहीर केले आहे. बार्बाडोसच्या विमानतळावरून उड्डाणांची वाहतूक बंद राहील. त्यामुळे उद्या म्हणजेच २ जून रोजी भारतीय संघ दिल्लीत दाखल होईल, असं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
देशभरात लागू झाले नवे तीन फौजदारी कायदे
पंतप्रधानांची जनतेशी पुन्हा ‘मन की बात’
आदित्य ठाकरेंना का वाटतेय बहुमजली झोपड्यांची चिंता?
टीम इंडियाच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ द ऑल टाइम’ विराटबद्दल नेटिझन्सकडून कृतज्ञता
दिग्गजांची निवृत्ती आणि बीसीसीआयकडून कोट्यवधी रुपयांचे बक्षीस
२९ जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली. यानंतर भारताचे दिग्गज खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली, रवींद्र जडेजा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. याशिवाय बीसीसीआयने भारतीय संघासाठी १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत ही घोषणा केली आहे. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात उत्कृष्ट खेळ, प्रतिभा, जिद्द आणि खिलाडूवृत्ती दाखवली, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले.