राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवन परिसरात बातमीदारांशी बोलताना दिली. या बद्दल सभागृहात लक्षवेधी मांडण्यात आली होती. त्यानंतर आपण हा निर्णय जाहीर केला असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात अनेक ज्येष्ठ नागरिक असे आहेत की त्यांची इच्छा तीर्थक्षेत्राला जाऊन देवदर्शन घेण्याची असते. मात्र आर्थिक अडचणीमुळे प्रत्येकाला ते शक्य होते, असे नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या यात्रेबद्दल लवकरच धोरण ठरवण्यात येणार आहे. इच्छुकांचे अर्ज ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. ही यात्रा कशी सुकर होईल, याकडे सरकार लक्ष देईल. यामध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन, इसाई, जैन, बौद्ध धर्मांची जी प्रमुख तीर्थस्थळे आहेत त्याचा समावेश असेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
हेही वाचा..
‘दिल्लीच्या विमानभाड्यात असामान्य वाढ करू नका’
धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकेचा अहवाल पक्षपाती’; भारताकडून सडकून टीका
बिहारमध्ये ११ दिवसांत पाच पूल कोसळले
ट्रम्प बायडेनना म्हणाले, मंच्युरियन. बायडेन म्हणाले तुम्ही ‘पराभूत’
– ड्रग्जमुक्त महाराष्ट्र होईपर्यंत कारवाई सुरु राहणार – शिंदे
राज्यात केवळ मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर जिथे जिथे ड्रग्ज विकले जाते त्या सर्व ठिकाणी बुलडोजर चालवण्याची कारवाई सुरु आहे. राज्यात ड्रग्ज विकणारे आणि बाळगणारे यांच्यावर कारवाई सुरु आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात परिसरात असणाऱ्या टपऱ्या, हॉटेल्स ड्रग्ज मिळणारी ठिकाणे, दुकाने यांच्यावर सुद्धा ही कारवाई करण्यात येत आहे. जो पर्यंत महाराष्ट्र ड्रग्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
– लाडकी बहिण योजनेचा जीआर काढला !
शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये आम्ही समाजातील सर्व घटकांना न्याय दिला आहे. निधीची तरतूद करूनच योजना आखल्या आहेत. लाडकी बहिण या योजनेचा जीआर काढून आजच विरोधी पक्षनेत्यांना दिला, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.