23 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामामानवी तस्करी प्रकरणी नौदलाच्या लेफ्टनंट कमांडरला अटक

मानवी तस्करी प्रकरणी नौदलाच्या लेफ्टनंट कमांडरला अटक

बोगस कागदपत्रांच्या आधारे अनेकांना कोरियाला पाठवले

Google News Follow

Related

मानवी तस्करी प्रकरणी नौदलाच्या लेफ्टनंट कमांडरला सीआययूने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययूने लेफ्टनंट कमांडर विपिन कुमार डागरला (वय २८) आज अटक केली आहे.

वेस्टर्न नेवल कमांडमध्ये इंजिनिअरिंग विभागात हा आरोपी कार्यरत होता. चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून बोगस कागदपत्रांच्या वापर करून तरुणांना दक्षिण कोरियात पाठवल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मानवी तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

विपिन कुमार डागरने आयएनएस केरळ मधून बीई मॅकेनिकल शिक्षण घेतले आहे. तो टुरिस्ट व्हिजावर तरुणांना दक्षिण कोरियाला पाठवायचा.  दक्षिण कोरियात शरणार्थींना नागरिकत्व मिळणे सोपे असल्याने दक्षिण कोरियाची निवड केल्याचा संशय पोलिसांना आहे.

दक्षिण कोरियाचा व्हिसा मिळवण्यासाठी अनेकांना बनावट कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी डागरवर त्याच्या साथीदारांसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप आहे.

गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कागदपत्रांचा वापर करून लोकांना परदेशात पाठवणाऱ्या रॅकेटमध्ये नौदलाचा अधिकारी सामील असल्याची माहिती त्यांना मिळाली.  खासकरून जम्मू काश्मीरच्या तरुणांना दक्षिण कोरियात पाठवल्याचा संशय पोलिसांना असून आतापर्यंत आठ ते दहा तरुणांना दक्षिण कोरियात पाठवले आहे. या तरुणांना  व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी डागरवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नौदलाच्या गणवेशात तो दक्षिण कोरियाच्या दूतावासाच्या कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांवर दबाव आणणार होता.

त्यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की, एखाद्याला कामासाठी परदेशात जायचे असेल तर ते त्यांना दक्षिण कोरियाला जाण्याचे आमिष दाखवत असे. व्हिसा मिळविण्यासाठी, बँक स्टेटमेंट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रे आवश्यक होती, जी ते बनावट कागदपत्रे बनवून सादर केली जात. त्यानंतर ही कागदपत्रे व्हिसासाठी अर्ज करण्यासाठी वापरली जात होती.

पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, आरोपी बनावट कागदपत्रांच्या आधारे दक्षिण कोरियाला टूरिस्ट व्हिसा देणार आहेत. ती व्यक्ती दक्षिण कोरियात आली की व्हिसाची कागदपत्रे फाडून टाकली जात. कागदपत्रे फाडल्यानंतर या व्यक्तींनी प्रथम दक्षिण कोरिया सरकारकडे आश्रय घ्यायचा आणि नंतर नागरिकत्वासाठी अर्ज करायचा अशी मोडस ऑपरेंडी असे.

हे ही वाचा:

मुंबईत सायलेन्सर, प्रेशर हॉर्न ‘रोडरोलर’ खाली चिरडले

मुंबईत ड्रग्सचे सिंडिकेट उद्ध्वस्त, डोंगरी, वडाळा, नागपड्यातून तिघे अटकेत

तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला भारत

गाझियाबादमध्ये लव्ह जिहाद !

व्हिसा प्रक्रिया जलद करण्यासाठी डागर दूतावासातील कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी नौदल अधिकारी म्हणून आपल्या दर्जाचा वापर करत असे. कोरियाला पाठवण्यासाठी आवश्यक असलेल्या एखाद्या व्यक्तीचा व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यास, तो काही दिवस अगोदर दूतावासात जाऊन चौकशी करायचा. अशाच एका भेटीदरम्यान त्याने व्हिसा मिळण्यास उशीर झाल्याने गोंधळ घातला. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी विपीनकुमार डागर याला कुलाबा येथून अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, डागर आणि त्याच्या मित्रांनी आतापर्यंत ८ ते १० लोकांना दक्षिण कोरियाला पाठवल्याचे कबूल केले आहे आणि प्रत्येक व्यक्तीकडून या प्रक्रियेसाठी १० लाख रुपये आकारले आहेत. डागर मूळचा हरियाणातील सोनीपतचे असून तो सहा वर्षांपूर्वी नौदलात दाखल झाला. तो  गेल्या वर्षभरापासून वेस्टर्न नेव्हल कमांडमध्ये तैनात होता. डागरचे वडील हवाई दलात कार्यरत होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने असेही नमूद केले की,  डागर आणि त्याच्या मित्रांनी दक्षिण कोरियाला पाठवलेले बहुतांश लोक जम्मू-काश्मीरमधील होते. या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा