23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषआइस्क्रीममध्ये सापडलेले बोट कर्मचाऱ्याचेच!

आइस्क्रीममध्ये सापडलेले बोट कर्मचाऱ्याचेच!

Google News Follow

Related

मालाडच्या एका डॉक्टरने आइस्क्रीमची ऑर्डर दिल्यानंतर त्याला आइस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा आढळला होता. या बोटाचा डीएनए अहवाल समोर आला आहे. हे बोट इंदापूरच्या आइस्क्रीम कारखान्यातील कर्मचाऱ्याचेच असल्याचे उघड झाले आहे.

काही दिवसांपूर्वी या आइस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाच्या तुकड्याने सर्वत्र खळबळ माजली होती. एका आइस्क्रीममध्ये माणसाच्या बोटाचा तुकडा आढळला होता. मुंबईतील मालाडमध्ये एका डॉक्टरच्या बाबतीत हा प्रकार घडला होता. मालाडचे डॉक्टर ओरलम बँडन सेराओने ऑनलाइन आइस्क्रीम मागवले होते. त्याने आइस्क्रीम उघडले तेव्हा त्यांना धक्का बसला. त्यांनी लगेच त्याचे छायाचित्र काढले आणि ते ऑनलाइन शेअर केले. या छायाचित्रात मांसाचा तुकडा दिसतो आहे. डॉक्टरला सुरुवातीला वाटले की, अक्रोड असेल. परंतु त्यांनी बारकाईने पाहिल्यावर ते मानवी बोट असल्याचे समजले. घाबरलेल्या डॉक्टरने लगेच मालाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आइसक्रीम ब्रँड युम्मोविरोधात तक्रार दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला.

अन्न व औषध प्रशासनाने आइसक्रीम उत्पादन परिसराची पाहणी करून कंपनीचा परवाना रद्द केला. आइस्क्रीम पाठवणारी कंपनी पुण्यातील इंदापूरमध्ये आहे आणि त्यांच्याकडे परवानाही आहे. चौकशीसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारखान्याच्या परिसरातील नमुने एकत्र केले होते. तपासादरम्यान डीएनए अहवाल आला आहे. त्यानुसार, मालाडच्या डॉक्टरला आइस्क्रीममध्ये मिळालेले बोट पुण्यातील इंदापूरमधील एका आइस्क्रीम कारखान्याच्या कर्मचाऱ्याचे आहे.

हे ही वाचा:

दुर्योधन कर भरतोय!

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस

दिल्लीतील विमानतळाच्या टर्मिनल- १ चे छत कोसळून सहा जण जखमी

“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”

आइस्क्रीममध्ये सापडलेले बोट आणि आइस्क्रीम कारखान्यात काम करमारा ओमकार पोटे यांचे डीएनए एकच असल्याचे अहवालात नमूद करण्त आले आहे. इंदापूरच्या कारखान्यात आइस्क्रीम भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान पोटे याच्या मधल्या बोटाचा एक भाग कापला गेला होता. नंतर तो मालाडच्या एका डॉक्टरने मागवलेल्या आइस्क्रीममध्ये सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा