छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात, सिल्गर आणि टेकलगुडेममध्ये २३ जून रोजी नक्षलवाद्यांनी CRPF कोब्रा बटालियनच्या वाहनाला लक्ष्य केले होते. यानंतर निमलष्करी दलाने कारवाई करत सहा नक्षलवाद्यांना अटक केली. यानंतर सर्व नक्षलवाद्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. यासोबतच या नक्षलवाद्यांकडून स्फोटकेही जप्त करण्यात आली आहेत.
निमलष्करी दलाने अटक केलेले सर्व नक्षलवादी जगरगुंडा येथील रहिवासी आहेत. २३ जून रोजी सीआरपीएफ कोब्रा बटालियनच्या ट्रकला स्फोट घडवण्याच्या कटात हे सर्व नक्षलवादी आणि त्यांच्या इतर साथीदारांचा सहभाग होता. या घटनेत सीआरपीएफ कोब्रा बटालियनचे दोन जवान शहीद झाले होते. तेव्हापासून पोलिसांची नक्षलविरोधी मोहीम राबवली जात असून, यादरम्यान जवानांनी साध्या वेशात जंगलात फिरणाऱ्या सहा नक्षलवाद्यांना अटक केली.
सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव यांनी सांगितले की, २३ जून रोजी झालेल्या स्फोटाच्या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी गस्त घालण्याचे प्रमाण वाढवले होते. सीआरपीएफ कोब्रा बटालियन आणि सुकमा पोलिसांच्या डीआरजी जवानांकडून या भागात सातत्याने शोधमोहीम सुरू होती. दरम्यान, तिमापुरम आणि टेकलगुडेम या भागात साध्या वेशातील काही संशयित लोक हातात पिशव्या घेऊन पाळायला लागले आणि जवानांना त्यांच्या दिशेने येताना पाहून ते लपून बसले.
हे ही वाचा:
“मुंबई शिक्षक, पदवीधर निवडणुकीत उबाठा सेनेने पैशाचा धुमाकूळ मांडला”
नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची बिहारमधून पहिली अटक, दोघेजण ताब्यात!
आरक्षण प्रश्नासंबंधित २९ जूनला मुंबईत सर्वपक्षीय बैठक
‘कोहलीने १५० किलोचे डंबेल उचलले, म्हणजे रोहित शर्माही तेवढे उचलेल असे नाही!
जवानांनी त्याच्या बॅगची झडती घेतली असता, त्यातून २२५ मीटर विद्युत वायर, बॅटरी, डिटोनेटर, पेन्सिल सेल, नक्षलवादी साहित्य, जिलेटिन रॉड आदी साहित्य जप्त करण्यात आले. स्फोटक साहित्य ठेवण्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी सुरक्षा दलांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने ही वस्तू ठेवल्याचे सांगितले. निमलष्करी दलाने अटक केलेल्या नक्षलवाद्यांनी या हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर नक्षलवाद्यांचीही माहिती दिली आहे. या नक्षलवाद्यांवर जागरगुंडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.