राज्यातील शिक्षक व पदवीधर अशा चार मतदारसंघांमध्ये मंगळवारी २६ जून रोजी मतदान पार पडलं. यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आमदार आशिष शेलार यांनी आरोप करत म्हटले आहे की, ठाकरे गटाने निवडणुकीच्या काळात पैशांचं वाटप केले आहे.
“काल विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या. दोन्ही निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान केलं. पण याचा जाणुनबुजून उल्लेख करावा लागेल की, उबाठा सेनेने पैशांचा धुमाकूळ घातला होता. शिक्षकांमधून उमेदवार असेलेल ‘अभ्यंकर’ भयंकर असल्याप्रमाणे त्यांचे कार्यकर्ते पैसे वाटत होते. तर दुसरीकडे पदवीधर मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार असणारे ‘परब’ अरब असल्याप्रमाणे त्यांचे लोक पैसे वाटण्याचं काम करत होते. त्यामुळेच पैशाच्या जोरावर मतदारांना विकत घेता येतं असं मानून पैशांचा धुमाकूळ उबाठा सेनेने घातला. काही अन्य उमेदवारांनीही त्यांना साथ दिली. पण भाजपाचे दोन्ही उमेदवार किरण शेलार आणि शिवनाथ दराडे यांच्याबरोबर आम्ही सगळ्यांनी संघटनेची पूर्ण ताकद लावली. माझा मतदारांवर विश्वास आहे. आमचा विजय मतदार सुकर करतील असा माझा दावा आहे,” असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.
देशात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर विधानपरिषद आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्या. यानंतर मतदान पार पडले.
हे ही वाचा:
नीट पेपरलीक प्रकरणी सीबीआयची बिहारमधून पहिली अटक, दोघेजण ताब्यात!
आरक्षण प्रश्नासंबंधित २९ जूनला मुंबईत सर्वपक्षीय बैठक
‘कोहलीने १५० किलोचे डंबेल उचलले, म्हणजे रोहित शर्माही तेवढे उचलेल असे नाही!
नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही खासगी संस्था असल्याचे वृत्त खोटे!
दरम्यान, गुरुवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. या अधिवेशनात पहिल्या दिवसाचं कामकाज अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडल्यानंतर तहकूब करण्यात आलं.