मालदीवच्या महिला मंत्री फातिमा शमनाज अली सलीम यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रपति मोहम्मद मुइज्जू यांच्याशी जवळीक साधण्यासाठी जादू टोणा केल्याचा आरोप या महिला मंत्र्यावर ठेवण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या फातिमा या पर्यावरण मंत्रालयात राज्यमंत्री आहेत. स्थानिक मीडियाने एका अधिकाऱ्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, मंत्री फातिमा शमनाज अली सलीम यांना अटक करण्यात आली असून त्यांना ७ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
मालदीव वृत्तपत्र अधाधुने वृत्त दिले आहे की, मंत्री फातिमा शमनाज या राष्ट्रपती कार्यालयाचे मंत्री एडम रमीज यांच्या पूर्व पत्नी आहेत. अटकेपूर्वी पोलिसांनी फातिमा शमनाजच्या घरावर छापा टाकला होता. त्यांच्या घरातून पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान, फातिमा शमनाज यांचे पूर्व पती एडम रमीज यांना मुइज्जू सरकारने निलंबित केल्याचा दावा स्थानीक मीडियाकडून केला जात आहे.
हे ही वाचा:
काश्मीरमधील पाच पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त !
राऊत म्हणतात, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा
रशियात भीषण अपघात; रेल्वेचे नऊ डबे रुळांवरून घसरले!
मणिपूरमध्ये अवैध प्रवाशांना बनावट आधार कार्ड आणि ओळखपत्रे!
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांच्या अगदी जवळ काम करणारे एडम रमीज गेल्या अनेक महिन्यांपासून दिसत नसल्याचे सांगण्यात येत आहे. फातिमा शमनाज आणि ॲडम रमीझ यांचा नुकताच घटस्फोट झाला होता. दरम्यान, एडम रमीज जादूटोण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत की नाही याची अद्याप पुष्टी झालेली नाही. तसेच मालदीवच्या राष्ट्रपती कार्यालयाने फातिमा शमनाझच्या अटकेशी संबंधित मुद्द्यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.